ITD Rules | कलम 234F माहिती आहे ना? आज शेवटची संधी, नाहीतर दंडासहीत ही होणार कारवाई
ITD Rules 234F | प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आज संपत आहे. त्यानंतर तुमच्यावर प्राप्तिकर कायदा 1961 कलम 234F अंतर्गत कारवाई होईल. त्यांना दंडाच्या स्वरूपात मोठी रक्कम भरावी लागते.
ITD Rules 234F | प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची आज अंतिम मुदत आहे. 31 जुलै 2022 रोजी आयटीआर (ITR) भरण्याची आजची शेवटची तारीख (Last Date) आहे. पण ज्यांनी अजूनही आयकर भरला नाही. त्यांना उद्यापासून प्राप्तिकर कायदा 1961 कलम 234F अंतर्गत कारवाई होईल. या कलमातंर्गत करदात्यांना विलंब शुल्कासह दंडाची रक्कम (late fee with penalty) ही भरावी लागणार आहे. प्राप्तिकर भरण्याची अंतिम मुदत विभागाने 31 जुलै निश्चित आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वेळा करदात्यांच्या सोयीसाठी मुदत वाढवण्यात आली होती. पण, यंदा ही मुदत वाढ न देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. महसूल सचिव (Revenue Secretary) तरुण बजाज यांनी आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत करदात्यांना आता नियोजित वेळेतच आयकर भारावा लागणार आहे.
5 कोटी करदाते
आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै 2022 रोजीपर्यंत 5.10 कोटींहून अधिक करदात्यांनी प्राप्तिकर रिर्टन भरला आहे. ट्विट करुन खात्याने याविषयीची माहिती दिली आहे. तसेच खात्याने आज कर भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे स्मरण ही करदात्यांना करुन दिले आहे. त्यानंतर कारवाईला करदात्यांना सामोरे जावे लागणार आहे.
More than 5.10 crore ITRs have been filed till 30th July,2022. Over 57.51 lakh #ITRs were filed on 30th July,2022 itself. Do remember to file yours, if not filed as yet. #FileNow to avoid late fee. Today is the due dt to file #ITR for AY 2022-23 Pl visit: https://t.co/GYvO3n9wMf pic.twitter.com/3bVrHid1MF
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 31, 2022
नियमातंर्गत दंडाची कारवाई
आज आयकर न भरल्यास प्राप्तिकर कायदा 1961 कलम 234F अंतर्गत करदात्यांवर कारवाई करण्यात येईल. करदात्यांनी उशीरा रिटर्न फाईल केल्याबद्दल त्यांच्याव दंड आकारण्यात येईल. या कलमांतर्गत प्राप्तिकर रिटर्न उशीरा दाखल करणाऱ्या करदात्यांकडून दंडाची रक्कम वसूल केली जाईल. 31 जुलै ही अंतिम तारीख आहे.
दंड किती ?
प्राप्तीकर खात्याने ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, त्यांनी 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करावा आणि विलंब शुल्कासहीत दंड टाळावा. म्हणजेच 1 ऑगस्टपासून तुम्हाला आयटीआर फाईल केल्यावर दंड भरावा लागणार आहे. वेळेवर रिटर्न भरून तुम्ही हे टाळू शकता. मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास दंड होऊ शकतो. मुदतीनंतर रिटर्न भरल्यास पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नासाठी 1 हजार रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर विलंब शुल्क 5,000 रुपये. 2021 पूर्वी उशिरा दंड म्हणून 10,000 रुपये भरावे लागत होते, परंतु नवीन नियमांनुसार दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे.
स्वत:च इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करा
आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर https://www.incometax.gov.in/iec/foportal युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड (Pan Card), आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26 एएसची आवश्यकता असेल.