नवी दिल्ली : केंद्र सरकारनं इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR filing) करण्याची अंतिम रारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ही तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करु शकतात. 31 डिसेंबरनंतर असं मानलं जात होतं की सरकारकडून आयटी रिटर्न फाईल करण्याची तारीख (ITR filing last date) वाढवली जाईल. कारण कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोक आयटी रिर्टन फाईल करु शकले नव्हते. आता सरकारने अशा लोकांना मोठा दिलासा दिला आहे.
आर्थिक वर्ष 2020-2021 चे टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 करण्यात आली आहे. लाईव्ह मिंटच्या एका वृत्तानुसार आता पुढील तीन महिन्यात करदाते आयकर परतावा भरु शकतील. आयटी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जाते. त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. त्याचे काही खास नियम आहेत. तसंच त्यात दंडाची आकारणीही होते. त्यामुळे आता करदाते कुठलाही दंड न भरता 15 मार्चपर्यंत आयकर परतावा भरु शकणार आहेत.
आर्थिक वर्ष (financial year) संपलं की तुम्हला मागील वर्षीच्या उत्पन्नाच्या गणनेसाठी (Calculation) 3-4 महिने दिले जातात. हा वेळी कर देण्यास पात्र उत्पन्न मोजणी आणि त्यानुसार कर देण्यासाठी असतो.
जर एखाद्या व्यक्तीचं निव्वळ उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्याच्यासाठी आयकर रिटर्न दाखल करावा लागतो. निव्वळ उत्पन्न म्हणजे सर्व प्रकारची कपात सोडून हातात आलेलं एकूण उत्पन्न. आयकर कायद्यात अनेक डिडक्शन आहेत. तुम्ही जितका त्याचा वापर करुन आपलं उत्पन्न कमी करता तितका तुम्हाला लागणारा कर कमी होतो. आयकर कलम 80 अंतर्गत 80 सी, 80 डी, 80 ई वगैरे नुसार डिडक्शन उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग कर देणेदारी कमी करण्यासाठीच होतो.
कर्ज मंजुरीच्या फायद्यांबाबत CA आणि फिनटूचे (Fintoo) संस्थापक मनीष पी हिंगर म्हणतात, “तुम्ही भविष्यात गाडी असो की घर कोणतेही कर्ज घ्या, पण आयटीआर फायलिंग केल्याची पावती तुमच्यासाठी महत्त्वाचा दस्तावेज असतो. बँक तुम्हाला कर्ज देण्याआधी मागील 3 वर्षांची आयटीआर पावती मागते. तुम्ही ही पावती दिली तर तुमचं कर्ज लवकर मंजूर होतं.
जर तुम्ही विजासाठी अर्ज केला असेल तर अनेक दुतावासांकडून मागील वर्षांची आयटीआर पावती मागितली जाते. कारण ते आयकर नियमांचे कठोर पालन करतात.
इतर बातम्या :