Investment Scheme : अवघ्या 150 रुपयांची बचत करेल मुलाला लखपती

Investment Scheme : या योजनेत तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागत असली तरी परतावा मात्र जोरदार मिळेल. ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Investment Scheme : अवघ्या 150 रुपयांची बचत करेल मुलाला लखपती
व्हा लखपती
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 7:30 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) प्रत्येक वयाच्या नागरिकांसाठी योजना चालविते. ही विमा कंपनी मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत खास आकर्षक योजना आणते. एलआयसीच्या काही योजना अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळतो. जर तुम्ही पण मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असाल तर एलआयसीची जीवन तरुण योजना (LIC Jeevan Tarun Policy) गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. या योजनेत मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करता येते. त्यातून मुलांच्या शिक्षणासाठी वा इतर कामासाठी आर्थिक सोय होते.

एलआयसीची जीवन तरुण योजना नॉन लिंक्ड, वैयक्तिक, विमा योजना आहे. विमा कंपनी या योजनेत गुंतवणूक केल्यास सुरक्षा आणि बचत दोन्ही सुविधा देते. मुलांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च आणि इतर आवश्यकतेनुसार गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

मुलांच्या नावे ही योजना घेण्यासाठी मुलांचे वय कमीत कमी 90 दिवस आणि कमाल 12 वर्ष असणे आवश्यक आहे. यापेक्षा मोठ्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करता येत नाही. मुलगा अथवा मुलगी 25 वर्षांचा झाल्यानंतर या योजनेत पूर्ण फायदे मिळतात.

हे सुद्धा वाचा

मुलाचे वय 20 वर्षे होईपर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागतो. कमीत कमी 75,000 रुपयांच्या सम अॅश्युर्डसाठी ही विमा योजना खरेदी करता येते. या योजनेत कमाल गुंतवणुकीसाठीची अट वा मर्यादा नाही. जर तुम्ही 12 वर्षाच्या मुलासाठी विमा योजना खरेदी करत असाल तर, किमान सम अॅश्युर्ड रक्कम पाच लाख रुपये असेल आणि कालावधी 13 वर्षांचा असेल.

दररोज 150 रुपयांची बचत तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगी पडेल. या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर वार्षिक प्रीमियम 54,000 रुपये असेल. पुढील आठ वर्षात तुम्ही या योजनेत 4,32,000 रुपयांची गुंतवणूक कराल.

या योजनेतील गुंतवणुकीवर 2,47,000 रुपयांचा बोनस मिळेल. या योजनेवर तुम्हाला पाच लाखांचा सम अॅश्योर्ड मिळेल. तसेच 97,000 रुपयांचे लॉयल्टी बोनस मिळेल. 4,32,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 8,44,500 रुपये मिळतील.

कोणतीही व्यक्ती वार्षिक, सहामाही, तिमाही अथवा मासिक आधारावर हप्त्याची रक्कम जमा करु शकते. एलआयसीने मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने ही योजना तयार केली आहे. मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

आता विविध पेमेंट अॅप आणि गेटवेमुळे (LIC Premium Through UPI) काही मिनिटांतच पेमेंट होते. त्यासाठी एलआयसीच्या कार्यालयात जाऊन चकरा मारण्याची गरज नाही. आता ग्राहक खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी पेटीएम, फोन पे, गुगल पे यांच्यामार्फत सहज प्रीमियम भरु शकतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.