Jio नं उडवली टेलीकॉम कंपन्यांची झोप, लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, आता फक्त एवढ्या रुपयांमध्ये मिळवा अनलिमिटेड डाटा
मुकेश अंबानी यांची टेलीकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने आपल्या ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे.जीओकडून आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांची टेलीकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने आपल्या ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे.जीओकडून आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमुळे एअरटेल व वोडाफोन आयडियाची झोप उडाली आहे, जीओच्या या स्वस्त प्लॅनची किंमत फक्त 49 रुपये आहे. 49 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमेटेड डाटा मिळणार आहे. जाणून घेऊयात या 49 रुपयांमध्ये तुम्हाला कोणकोणती सेवा मिळणार आहे? हा प्लॅन किती दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे त्याबाबत.
जीओकडून 49 रुपयांचा प्लॅन लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये कंपनीकडून तुम्हाला अनलिमिडेट डाटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तास अर्थात एक दिवस इतकी असणार आहे.डेटाबाबत बोलायचं झाल्यास कंपनीने आपल्या ऑफिशयल साइटवर दिलेल्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक दिवसांसाठी अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. हा प्लॅन जिओकडून आपल्या ग्राहकांना 25 जीबी एफयूपीसोबत देण्यात येणार आहे.
Airtelचा 49 रुपयांचा प्लॅन
दरम्यान दुसरीकडे एअरटेलकडून देखील आपल्या ग्राहकांना 49 रुपयांचा प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे, या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना अनलिमिटेड डाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची मुदत देखील एक दिवस इतकीच असणार आहे. हा देखील ग्राहकांसाठी एक चांगला प्लॅन ठरला असून, ग्राहकांकडून या प्लॅनला पसंती मिळत आहे.
आयडीया, वोडाफोनची ऑफर
आयडीया वोडाफोनकडून देखील ग्राहकांना असाच एक प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याची व्हॅलिडिटी देखील 49 रुपये एवढीच असून ही कंपनी देखील आपल्या ग्राहकांना 49 रुपयांमध्ये अनलिमिटेड डाटा उपलब्ध करून देणार आहे.
बीएसएनलकडूनही ऑफरची खैरात
दरम्यान ग्राहकांना आपल्या कडे आकर्षित करून घेण्यासाठी सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातूनच अनेक स्वस्त प्लॅन कंपण्यांकडून लाँच केले जात आहेत. आता या स्पर्धेत बीएसएनएल देखील उतरलं असून, कंपनीकडून आपल्या ग्राहकांना अनेक स्वस्त आणि जास्त व्हॅलिडिटी असलेले प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बीएसएनलच्या ग्राहकांमध्ये देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.