Jio चा धमाका, अमर्यादित डेटासह नवे प्लॅन लाँच; 200 रुपयात 14 OTT प्लॅटफॉर्मचा एक्सेस
Jio Fiber Plan: Jio ने मनोरंजन ‘बोनान्झा प्लॅन’ लाँच केले आहेत. कंपनीने Jio Fiber पोस्टपेड युजर्संसाठी हे ‘प्लॅन’ जारी केले आहेत. यामध्ये युजर्सना Amazon Prime Video, Netflix आणि इतर ‘प्लॅटफॉर्म’ सह 14 OTT प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.
Jio ने फायबर युजर्संसाठी (Fiber users) एक नवीन ऑफर आणली आहे. कंपनीने Jio Fiber Entertainment Bonanza योजना जाहीर केली आहे. हा प्लॅन सध्याच्या आणि नवीन Jio Fiber ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ब्रँडने हा प्लान Jio Fiber पोस्टपेड श्रेणीमध्ये लॉंच केला आहे. यामध्ये नवीन ग्राहकांना शून्य दरात प्रवेश मिळत आहे. Jio Fiber चे नवीन प्लान 399 रुपयांपासून सुरू होतात. कंपनी यामध्ये OTT प्लॅटफॉर्मवरही प्रवेश देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. Jio Fiber प्लॅनमध्ये युजर्संसाठी इंटरनेट बॉक्स (Internet box) (गेटवे राउटर), सेट टॉप बॉक्स आणि Jio Fiber पोस्टपेड कनेक्शनसह मोफत इंस्टॉलेशन मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार या सर्वांची किंमत सुमारे 10 हजार रुपये आहे. यासह, युजर्संना 100 रुपये अतिरिक्त देऊन अमर्यादित मनोरंजनाचा (Unlimited entertainment) लाभ घेता येईल.
Jio Fiber प्लॅनमध्ये काय उपलब्ध असेल, वापरकर्त्यांना इंटरनेट बॉक्स (गेटवे राउटर), सेट टॉप बॉक्स आणि Jio Fiber पोस्टपेड कनेक्शनसह मोफत इंस्टॉलेशन मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार या सर्वांची किंमत सुमारे 10 हजार रुपये आहे. यासह, वापरकर्त्यांना 100 रुपये अतिरिक्त देऊन अमर्यादित मनोरंजनाचा लाभ मिळेल.
काय आहे या नवीन ऑफर मध्ये
Jio Fiber चे नवीन प्लॅन 22 एप्रिल 2022 पासून उपलब्ध होतील. नवीन ऑफर अंतर्गत, युजर्संना अमर्यादित डेटासाठी 399 रुपये प्रति महिना प्रारंभिक किंमत मोजावी लागेल. ग्राहक फक्त 100 ते 200 रुपये अतिरिक्त देऊन 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळवू शकतात.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल?
Jio ने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना डिस्ने + हॉटस्टार, Zee5, Sony liv, Voot, Sunnxt, Discovery +, Hoichoi, Alt balaji, Eros Now, Lionsgate, Shemaroo Me, Universal +, Voot Kids यासह Jio Cinema मिळेल. 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश उपलब्ध असेल. जीओचे ग्राहक या सर्व मनोरंजन अॅप्सचा आनंद छोट्या आणि मोठ्या स्क्रीनवर घेऊ शकतात.
कोणत्या प्लॅनमध्ये काय मिळेल?
399 रुपयांमध्ये यूजर्सला 30Mbps स्पीडने इंटरनेट मिळेल. दुसरीकडे, तुम्ही 100 रुपये अधिक भरल्यास, तुम्हाला 6 अॅप्समध्ये प्रवेश मिळेल आणि तुम्ही 200 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास, तुम्हाला 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. या यादीतील सर्वात महाग योजना रु. 3,999 प्रति महिना आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1000Mbps स्पीड इंटरनेट आणि 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल.
जिओ फायबर पोस्टपेड कसे घ्यावे?
यासाठी ग्राहकांना My Jio अॅपवर जावे लागेल. येथे त्यांना Entertainment Plans वर क्लिक करावे लागेल. आता नवीन प्लॅनसाठी युजर्सला आगाऊ भाडे द्यावे लागणार आहे. जीओचे प्रीपेड वापरकर्ते त्यांच्या योजना पोस्टपेडवर स्थलांतरित करू शकतात. यासाठी त्यांना OTP द्वारे त्यांचा नंबर व्हेरीफाय करावा लागेल. तुम्हाला My Jio अॅपवरून तुमचा प्लॅन निवडावा लागेल आणि नंतर त्यासाठी पैसे द्यावे लागतील.
इतर बातम्या :
Samsung चा नवीन 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, बाजारात दाखल होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्स लीक
Best Camera Phones: बेस्ट कॅमेरावाले बजेट स्मार्टफोन्स, किंमत 10 हजारांहून कमी