AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job Insurance : नोकरीवरुन केले कमी? बँकेत जमा होत राहील Salary

Job Insurance : अनेक स्टार्टअप्सने तरुणांचे हातच नाही तर तोंडही पोळलं आहे. चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण झटक्यात कित्येक हजार तरुणांचा जॉब गेला. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहींवर अजूनही नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. अशावेळी हा फॉर्म्युला उपयोगी पडू शकतो. दुसरं काम मिळेपर्यंत तुमच्या आर्थिक भागवणे आवश्यक आहे.

Job Insurance : नोकरीवरुन केले कमी? बँकेत जमा होत राहील Salary
| Updated on: Sep 28, 2023 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्था जोमात आणि अनेक अर्थव्यवस्था कोमात अशी अवस्था आहे. अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये कपातीचे धोरण सुरु आहे. तर अनेक स्टार्टअप्सने तर घोर निराशा केली आहे. मोठा निधी जमवून, शासनाकडून सवलती पदरात पाडून या स्टार्टअप्सने गल्ला जमावला. मोठी भरती प्रक्रिया राबवली. पण अवघ्या एक-दोन वर्षांतच कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा पायंडा त्यांनी सुरु केला आहे. अनेक स्टार्टअप्स तर गुंडाळण्याची वेळ आलेली आहे. कंपन्यांनी नोकर भरतीचे नियम बदलवले आहेत. आयटीसह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना (Lay Off) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आता नोकरी गमावण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. या पर्यायामुळे पुढील नोकरी मिळेपर्यंत काही दिवस तरुणांना आर्थिक मदत मिळेल.

काय आहे हा विमा

जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर (Job Loss Insurance Cover) अशा पडत्या काळात महत्वाचा ठरतो. बाजारात अशा प्रकारचा विमा दाखल झाला आहे. अनेक कंपन्या त्यासाठी ऑफर घेऊन आल्या आहेत. या कंपन्या लिंक्ड विमा देत आहेत. अजून हा स्वतंत्र विमा नाही तर एक रायडर आहे. म्हणजे इतर विमा पॉलिसीसोबत तुम्ही हा विमा घेऊ शकता. हे रायडर विमा योजनेसोबत जोडू शकता. प्रत्येक विमा कंपनीचे त्यासाठी वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत.

या गोष्टी ठेवा लक्षात

  1. जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरसाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत
  2. नोकरी गमावल्यावर विमाधारकाला आर्थिक सुरक्षा मिळते
  3. विमा कंपन्या एका निश्चित कालावधीसाठी आर्थिक मदत देतात
  4. काही विमा कंपन्या नोकरी मिळविण्यासाठी पण मदत करतात
  5. स्थायी आणि अस्थायी स्वरुपात हा विमा खरेदी करता येतो
  6. काही कंपन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देत नाहीत
  7. भ्रष्टाचार, घोटाळा वा इतर काही कारनामा केला असेल तर विम्याचा लाभ मिळत नाही
  8. विमा घेण्यापूर्वी कंपनीच्या नियम व अटी जरुर वाचा

कोणाला मिळतो विमा

  • कंपनीत तुम्ही कायमस्वरुपी कर्मचारी असावेत
  • अंशकालीन, कंत्राटी, फ्रीलान्सर कर्मचाऱ्यांना काही कंपन्या लाभ देत नाहीत
  • कर्मचारी हा भारतीय नागरिक असावा
  • ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, ती कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत असावी
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.