Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी आरामदायी; 18 ऑगस्टला एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात 

या बस सुरुवातीला तीन मार्गावरून धावणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी आरामदायी; 18 ऑगस्टला एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस 'बेस्ट'च्या ताफ्यात 
काल बसचा स्थापना दिवस होताImage Credit source: sabrangindia.in
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 9:37 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांचा प्रवास (travel) आणखी सुखर होणार आहे. लोकलनंतर (Local) बेस्टला मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन मानली जाते. दररोज हजारो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. कोरोना (Corona) काळात लोकलसेवा बंद होती तेव्हा बेस्टने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बेस्ट उपक्रमांतर्गत मुंबईकरांच्या सेवेत एसी बसनंतर 18 ऑगस्टपासून एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बेस्टने आपल्या ताफ्यात 900 डबल डेकर बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही 18 ऑगस्टला बेस्टमध्ये दाखल होणार आहे. ही बस अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अशी असणार आहे. यामध्ये नव्या बसला दोन जिने, डिजिटल टिकेटिंगची सोय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

एसी डबल डेकर बसची वैशिष्टे

बेस्टने आपल्या ताफ्यात तब्बल 900 डबल डेकर बसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस 18 ऑगस्टला बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या डबल डेकर बस या डिझेलवर धावत आहेत. मात्र ही बस इलेक्ट्रिक असणार आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.प्रवास आरामदायी व्हावा यासाठी या बसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये या बसला दोन जिने असणार आहेत. तसेच डिजिटल टिकेटिंगची सोय आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये या बसबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

भाडे किती असणार?

या बस सुरुवातीला तीन मार्गावरून धावणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. किमान अंतरासाठी म्हणजेच पाच किलोमिटरसाठी प्रवाशांकडून सहा रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.