Aadhar Card : घर बसल्या बनवा पीव्हीसी आधार कार्ड.. जाणून घ्या आधार कार्ड बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Apr 17, 2022 | 2:44 PM

आधार कार्डच्या महत्त्वाबद्दल तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही कारण आधारचे महत्त्व आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. हे लक्षात घेऊन, तुम्ही केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी PVC आधार कार्ड घरबसल्याच तुम्ही काढू शकता. तर मग, पाहूया या घरबसल्या आधार कार्ड काढण्याची संपूर्ण प्रक्रीया

Aadhar Card : घर बसल्या बनवा पीव्हीसी आधार कार्ड.. जाणून घ्या आधार कार्ड बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया
Adhar Card
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आधार हा 12-अंकी ओळख क्रमांक आहे, जो भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार कार्डवर लिहिलेल्या 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांकामध्ये नागरिकांची सर्व आवश्यक माहिती तसेच त्यांचे बायोमेट्रिक्स देखील नोंदवले जातात. यामुळेच आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज (Important documents) बनले आहे. आधार कार्डचे महत्त्व यावरून समजू शकते की त्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडू शकतात. एवढेच नाही तर आधारशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आधारच्या गरजा लक्षात घेता त्याची सुरक्षितताही (Safety too) खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे UIDAI सुद्धा अत्यंत कमी शुल्कात नागरिकांना PVC आधार कार्ड उपलब्ध करून देते. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड दीर्घकाळ सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही पीव्हीसी आधारसाठी सहज अर्ज करू शकता. चला जाणून घेऊया PVC आधार कार्डसाठी (PVC Aadhar Card)अर्ज कसा करायचा

फक्त 50 रुपयांत बनते PVC आधार

PVC आधार कार्ड बनवण्याची फी 50 रुपये आहे, याशिवाय त्याची प्रिंटही चांगली असते. पन्नास रुपयांत कर आणि कुरिअर शुल्क समाविष्ट आहे. पीव्हीसी आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम आधार वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइट उघडल्यानंतर, सर्वात खाली ऑर्डर आधार PVC कार्ड वर क्लिक करा.

• Order Aadhaar PVC कार्ड वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड इथे टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
• Send OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. आता OTP क्रमांक टाका आणि नियम आणि अटींवर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमच्या आधारचे तपशील दाखवले जातील आणि खालच्या बाजूला तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल.
• आता मेक पेमेंट वर क्लिक करा, जिथे तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंग आणि UPI द्वारे पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. आता तुमच्या आवडीचा पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
• पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला PVC आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी संपूर्ण तपशील मिळतील. खाली आल्यावर, तुम्हाला पावती स्लिप डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि पावती स्लिप डाउनलोड करा.
• PVC आधार कार्डसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांत, PVC आधार कार्ड तुम्हाला भारतीय पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे घरपोच येईल.

संबंधित बातम्या :

आयटी सेक्टरला बुस्टर? या दोन बलाढ्य कंपन्यांची अशी राहिल कामगिरी… ब्रोकिंग कंपन्यांचा अंदाज

Best investment options : 15-15-15 सुत्राचे पालन करा; काही वर्षांमध्ये कोटीचा परतावा मिळवा

घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट