Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदनी अठन्नी खर्चा रुपैया; ‘असं’ ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण

तुम्हाला तुमच्या पैशांचा हिशोब ठेवता आला पाहिजे म्हणजेच बजेट करता आलं पाहिजे. तुम्हाला खर्चाची नोंद ठेवण्यासाठी डायरी ठेवण्याची गरज नाही, अ‍ॅपचा वापर करूनही खर्चाची नोंद ठेवता येते. उदाहरणार्थ वॉलनट, कॅशबुक आणि मायमनी अ‍ॅप तुम्हाला उपयोगी ठरू शकतील.

आमदनी अठन्नी खर्चा रुपैया; 'असं' ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 5:40 AM

मुंबईत राहणारी स्वरा इंजिनिअर (Engineer) आहे आणि तिला चांगल्या पगाराची (Salary) नोकरीही (job) आहे.  महिन्याच्या एक तारखेला पगार झाल्यानंतर स्वरा आनंदी असते. मात्र,  20 तारखेपर्यंत तिचा आनंद चिंतेत परावर्तीत होतो. कारण बँक खात्यात पैसेच शिल्लक नसतात. त्यामुळे बऱ्याचदा तिला आई-वडिलांकडून पैसे मागवावे लागतात किंवा मित्र -मैत्रिणीकडून उधार घ्यावे लागतात. नोकरी करणाऱ्या स्वराचे अजूनही लग्न झालेलं नाही, तरीही महिन्याच्या शेवटी इतरांना पैसे मागावे लागत असल्यानं तिला खूप वाईट वाटतं. मग अशावेळी स्वरानं काय करायला हवं की त्यामुळे तिला कोणाकडेही पैसे मागावे लागणार नाहीत. याऊलट घरी थोडेसे पैसे पाठवणं शक्य होईल?. स्वराप्रमाणेच तुमचीही अवस्था असेल, महिन्याचा पगार तुम्हाला पुरतच नसेल किंवा अति खर्चामुळे पैसे उडत असतील तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

पैशांचा हिशोब ठेवा

तुम्हाला तुमच्या पैशांचा हिशोब ठेवता आला पाहिजे म्हणजेच बजेट करता आलं पाहिजे. तुम्हाला खर्चाची नोंद ठेवण्यासाठी डायरी ठेवण्याची गरज नाही, अ‍ॅपचा वापर करूनही खर्चाची नोंद ठेवता येते. उदाहरणार्थ वॉलनट, कॅशबुक आणि मायमनी अ‍ॅप तुम्हाला उपयोगी ठरू शकतील. आता अ‍ॅपचा विषय सोडून थेट तुमच्या खिशाकडे वळूयात. पगार जमा होताच त्यातीच 20 ते 30 टक्के रक्कम बाजूला काढावी,असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. या पैशांची तुम्ही SIP काढू शकता किंवा लिक्विटीडी फंडमध्येही गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीसोबतच आम्ही तुम्हाला खर्च कमी करण्यासाठी टिप्स सुद्धा देत आहोत.

गरज नसेल तर इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर टाळा

गरज नसेल त्यावेळी इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करू नका. एसीचं तापमान 24 डिग्री सेल्सिअसवर ठेवल्यास वर्षभरात किमान 4 हजार रुपयांची बचत होते. तसेच ऋतुमानानुसार तुम्ही रेफिजेरेटची कुलिंग कमी आणि जास्त करू शकता. त्यामुळे फ्रीजला कमी वीज लागेल. कॉम्युटर आणि लॅपटाप वापरत नसाल तर शटडाऊन करा. इलेक्ट्रीक उपकरण बंद असतानाही प्लग इन असल्यास काहीप्रमाणात विजेचा पुरवठा सुरू राहत असल्यानं प्लगमधून पिन बाजूला काढा. तुम्ही OTT, NEWS APP आणि इतर अ‍ॅपचं सबसक्रिप्शनचं नुतनीकरण करू शकता. सगळ्याचं  पसाठी पैसे देण्याऐवजी ज्या अॅपचा तुम्ही सर्वाधिक वापर करता तेच सुरू ठेवा. सिगरेट आणि दारूमुळे आरोग्याची तर हानी होतेच त्यासोबतच तुमचा खिसाही मोठा प्रमाणात रिकामा होतो. व्यसनाचा त्याग केल्यास फार मोठी रक्कम बचत करू शकता.

अनावश्यक खर्च टाळा

महिन्यातून एखाद्यावेळेस हॉटेलमध्ये खाणं किंवा आठवड्यातून एकदा बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यात काही गैर नाही. मात्र,  तुमचा हॉटेलिंगचा खर्च वाढत असल्यास सावधान झालं पाहिजे क्रेडिट कार्डचं बिल वेळच्यावेळी भरा, शेवटच्या तारखेनंतर क्रेडिट कार्डचं बिल भरल्यास तुम्हाला दंड लागतो. चांगले रेटिंग असणारे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करा. ही उपकरणे थोडी महाग असतात मात्र, या उपकरणांना वीज कमी लागत असल्यानं बचत होते. वाहतूकीवर होणारा खर्च कमी केल्यास तुम्ही पैशासोबतच पर्यावरणाचंही संवर्धन करू शकता. कार पुलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास बचत होते. खर्च कमी करण्याचा शेवटचा आणि महत्वाचा उपाय अनावश्यक शॉपिंग टाळा. पैसा कमावण्यासोबतच बचत करण्याचीही सवय लावा. बचत करणे म्हणजेच पैसा कमावणे आहे.

संबंधित बातम्या

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम

नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.