Investment: दरमहा गुंतवा रक्कम, वर्षभरात छोट्या बचतीतून होणार मोठा फायदा

Investment: दरमहा ठराविक रक्क गुंतवणूक तुम्ही वर्षाकाठी होणाऱ्या बचतीमधून मोठी कमाई करु शकता..

Investment: दरमहा गुंतवा रक्कम, वर्षभरात छोट्या बचतीतून होणार मोठा फायदा
बचतीवर कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 10:26 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल अथवा अल्पबचतीतून (Small Savings) ठराविक रक्कम तुम्हाला उभारायची असेल तर त्यासाठी काही योजना फायदेशीर ठरतात. या योजनांमधून बचत तर होतेच पण चांगला परतावाही मिळतो.

आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit) जोखीम नसते. पण परतावा चांगला मिळतो. गुंतवणुकीचा आणि बचतीचा हा चांगला पर्याय ठरतो. गुंतवणूकदाराला पोस्ट ऑफिस अथवा बँकेत या योजनेत गुंतवणूक करता येते. त्यामाध्यमातून नियमीत बचतीची सवयही लागते.

पोस्ट खाते अथवा कोणत्याही बँकेत Recurring Deposit खाते उघडता येते. हे खाते अवघ्या 100 रुपये महिन्यापासून सुरु करता येते. दर महिन्याला ठराविक दिवशी तुम्ही खात्यात रक्कम जमा करु शकता. मुदत ठेव योजनांपेक्षा या खात्यात अधिकची कमाई करता येते, कारण एफडी पेक्षा या खात्यात अधिक व्याज मिळते.

हे सुद्धा वाचा

RD खात्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही जेवढे जास्त दिवस या खात्यात रक्कम ठेवाल, तेवढे कपांऊंडिंग द्वारे जास्त व्याज मिळते. त्याआधारे अधिकची रक्कम मिळते. गुंतवणुकीवर अधिकचा फायदा होतो.

RD खाते सुरु करण्यापूर्वी इतर बँक अथवा पोस्ट खात्यातील व्याजदर एकदा तपासा. ज्या ठिकाणी जास्त व्याजदर मिळत असेल तिथे गुंतवणूक करा.

RD खात्याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तु्म्हाला हे खाते सुरु करण्यासाठी संबंधित बँकेत बचत खाते असावे असे बंधन नाही. हे खाते तुम्ही 10 वर्षांकरीता उघडू शकता.

साधारणतः बँका एफडीवर 2.75 टक्के ते 6 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. काही बँका तर याहीपेक्षा व्याज देतात. ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर अजून वाढून मिळतो. त्यामुळे त्यांना जास्त परतावा मिळतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.