नोकरी बदलतेवेळी पीएफचं काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्ही सतत नोकरी (Job) बदलत असाल तर प्रत्येक वेळी नोकरी सोडल्यानंतर पीएफची (PF) रक्कम काढू नका, यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजेच (UAN) मुळे नव्या संस्थेमध्ये पीएफ अकाऊंट उघडण्याची गरज नाही. आता पीएफसाठी देशभरात एकच खातं पुरेसं आहे.

नोकरी बदलतेवेळी पीएफचं काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 5:40 AM

मुंबई : जर तुम्ही सतत नोकरी (Job) बदलत असाल तर प्रत्येक वेळी नोकरी सोडल्यानंतर पीएफची (PF) रक्कम काढू नका, यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजेच (UAN) मुळे नव्या संस्थेमध्ये पीएफ अकाऊंट उघडण्याची गरज नाही. आता पीएफसाठी देशभरात एकच खातं पुरेसं आहे. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात इतर बचत योजनापेक्षा पीएफवर सर्वाधिक साडेआठ टक्के व्याज दर मिळतो. प्रत्येक महिन्यात करण्यात आलेल्या लहानश्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देणारी ही योजना आहे. कर योजनेच्या बचतीसाठीही पीएफची योजना चांगली आहे. आयकर कलम 80 सी च्या योजनेअंतर्गत पीएफमध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास करात सवलत मिळते. तुम्ही नोकरी करत असताना ही रक्कम न काढल्यास निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. विशेष म्हणजे मिळणाऱ्या रक्कमेवर कोणतेही व्याज लागत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला

गुंतवणूक सल्लागार आणि ऑप्टिमा मनीचे एमडी पंकज मठपाल म्हणतात की गुंतवणुकीसाठी पीएफ ही सर्वाधिक चांगली योजना आहे. विशेषत: निवृत्तीसाठी तर याच्यासारखी कोणतीही योजना नाही. इतर योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा पीएफमध्ये गुंतवणूक केल्यास खूप मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. निवृत्त होईपर्यंत तुम्ही पीएफ खात्यामधून पैसै न काढल्यास तुम्हाला पेंशनही चांगली मिळते. पेंशन स्कीम-95 नुसार निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेंशन देण्यात येते. पीएफ खाते दहा वर्ष नियमितपणे सुरू ठेवल्यास वयाच्या 58 व्या वर्षानंतर पेंशनच्या रुपानं तुम्हाला ठराविक रक्कम मिळते. जे कर्मचारी पीएफ खात्यातून दहा वर्षाच्या आत पैसे काढतात त्यांना पेंशनचा लाभ मिळत नाही.

…तर भरावा लागेल कर

आयकर नियमानुसार पाच वर्षाच्या सेवाकाळाआधीच पीएफ खात्यातून पैसे काढले असल्यास त्याचा उत्पन्नात समावेश होतो. कर रचनेनुसार त्यासाठी करही भरावा लागतो. जर तुम्ही पाच वर्षानंतर पैसे काढले असल्यास या रक्कमेवर कर लागत नाही. त्यामुळेच मौजमजेसाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्यात कोणतेही शहाणपणा नाही. तरुणपणात कोणतंही काम करून वेळ निभावता येते. मात्र, म्हातारपणी पैसा नसल्यास गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे पीएफला म्हातारपणाची काठी मानले जाते.

संबंधित बातम्या

ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने एफडीचे व्याजदर बदलले, पाहा नवे दर

कच्च्या तेलाच्या किंमती भडकताच निर्देशांकात पडझड

कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.