केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) अनेक नियमात बदल केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणींना मोठा ब्रेक लागला आहे. त्यांना वेळेवर पैसे उपलब्ध होत आहे. त्यांची अनेक अडचणीतून सूटका झाली आहे. ईपीएफओने आरोग्य, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसंदर्भात ॲडव्हान्स क्लेमसाठी ऑटो मोड सेटलमेंटची सुविधा दिली आहे. या सुविधेचा लाभ पीएफ खातेधारकांना होईल. सध्या 6 कोटींहून अधिक खातेदार आहेत. त्यांना आता जलद पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता तीन ते चार दिवसांत रक्कम
ईपीएफओच्या ॲडव्हान्स साठी दावा प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ होती. पूर्वी या प्रक्रियेसाठी कमीतकमी 15-20 दिवस लागत होते. पण आता हे काम अवघ्या 3 ते 4 दिवसात पूर्ण होते. सदस्याची पात्रता, कागदपत्रे, ईपीएफ खात्याचे केवायसी स्टेट्स, बँक खात्याची सविस्तर माहिती यांची खात्री आणि तपासणी केल्यानंतर ही रक्कम मिळत होती. पण आता ऑटोमेटेड सिस्टिममध्ये स्क्रुटनी आणि अप्रुव्हल म्हणजे पडताळणी आणि मंजूरी मिळते. त्यामुळे दावा सहज मंजूर होतो.
कोण करु शकतो दावा?
यापूर्वी हा आपात्कालीन निधी केवळ आरोग्यसाठी काढता येत होता. त्यासाठी ऑटोमोडची सुरुवात एप्रिल 2020 मध्ये करण्यात आली होती. आता सेवांचा परीघ वाढवण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी EPF चा पैसा काढता येतो. जर बहिण अथवा भावाचे लग्न असेल तर ईपीएफमधून आगाऊ रक्कम काढता येते.
किती काढता येते रक्कम?
EPFO खात्यातून आगाऊ रक्कम काढता येते. आता पीएफ खातेधारकांना 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. पूर्वी ही मर्यादा अवघी 50 हजार रुपये इतकी होती. ही आगाऊ रक्कम काढण्याचे काम ऑटो सेटलमेंट मोडद्वारे करता येते. त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. केवळ तीन दिवसात ही रक्कम सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तुमच्या खात्यात जमा होते. त्यासाठी पीएफधारकाला KYC, दाव्याची विनंती, बँकेची सविस्तर माहिती द्यावी लागते. या सुविधेमुळे आता जलद पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.