Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salary Account | सारखी नोकरी बदलता? जुनं सॅलरी अकाऊंट बंद करायला विसरु नका, नाहीतर…

Salary Bank Account : सॅलरी अकाऊंट हे झीरो बॅलन्स तत्त्वावर उघडलं जातं. पण सेव्हिंग अकाऊंटचं तसं नसतं. सेव्हिंग अकाऊंटसाठी 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत किमान रक्कम ठेवणं बंधनकारक असतं.

Salary Account | सारखी नोकरी बदलता? जुनं सॅलरी अकाऊंट बंद करायला विसरु नका, नाहीतर...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:28 PM

मुंबई : तुम्ही जर सातत्यानं नोकरी बदलत असाल, तर तुम्ही तुमचं जुनं सॅलरी अकाऊंट (Salary Account) बंद करणं नितांत गरजेचं आहे. तसं केलं नाही, तर मात्र तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो. म्हणून सातत्यानं कामासाठी नोकरी बदलणाऱ्यांनी कामाची बातमी वाचायलाच हवी. अनेकदा सॅलरी अकाऊंट बंद न केल्यामुले अनेकांना अतिरीक्त पैसे भरावे लागतात. तुमचा पगार कंपनी ज्या बँक खात्यामध्ये क्रेडिट (Salary Credit) करत असते, ते खातं नोकरी सोडल्यानंतर (After job Change) जर तुम्ही वापरत नसाल, तर मात्र तुमच्या अडचणी वाढू शकतात. वापरात नसलेल्या सॅलरी अकाऊंटबाबत जर तुम्हाला काहीच माहीत नसेल, आणि वेळ टळून गेल्यानंतर जर तुम्हाला तेच खातं पुन्हा सुरु करण्याची वेळ आली, तर मात्र तुम्हाला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं. उदाहरणासाठी एका तरुणासोबत घडलेला किस्सा नेमका काय होता, हे आधी जाणून घेऊयात.

सोप्प करुन समजून घेऊ..

इंजिनिअर असलेला प्रदीप मुंबईतून पुण्यात नोकरीसाठी गेला. पण जुनं सॅलरी अकाऊंट त्यानं बंद केलं नव्हतं. तेव्हा जुन्या बँक अकाऊंटबाबत तो विचारणा करायला गेला, तेव्हा बँक मॅनेजरने त्याला उटले अधिकचे सहा हजार रुपये भरायला सांगितले. प्रदीपच्या सॅलरी अकाऊंटमध्ये बाराशे रुपये आधीच होते. पण चार महिन्यांनंतर तो जेव्हा आपलं जुनं सॅलरी अकाऊंटबाबत विचारायला गेला, तेव्हा मात्र त्यालाच धक्काच बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार महिने जे बँक अकाऊंट त्यानं वापरलं नाही, त्याच अकाऊटंमध्ये आता पुन्हा प्रदीपला सॅलरी येणार होती. इथूनच पुढे प्रश्न निर्माण झाला, की आता करायचं काय?

प्रदीपसोबत घडलेला प्रकार हा काही एकमेव नाही. त्यासारखे अनेक जण असे आहेत, ज्यांनी आपलं सॅलरी अकाऊंट बंद केलेलं नाही. तर अशा सगळ्यांनी आपल्या वापरात नसलेल्या जुन्या सॅलरी अकाऊंटबद्दल तत्काळ काही महत्त्वाची गोष्टी करुन घेण्याची गरज आहे. जर अशांना सॅलरी अकाऊंट पुन्हा भविष्यात कधीच वापरायचं नाहीये, तर त्यांनी तत्काळ आपलं हे अकाऊंट बंद करण्याची गरज आहे.

3 महिने महत्त्वाचे!

जर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ तुम्हील सॅलरी अकाऊंट वापरत नसाल, त्यात ट्रानझॅक्शन करत नसाल, तर मात्र तुम्ही वेळीच काही पावलं उचलायला हवीत. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ वापरात नसलेलं सॅलरी अकाऊंट ते सेव्हिंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं. या सेव्हिंग अकाऊंटमध्ये एक किमान रक्कम ठेवणं बंधनकारक असतं. म्हणजेच मिनिमम अकाऊंट बॅलन्स नसेल तर या सेव्हिंग अकाऊंटवर पेनल्टी लावली जाते. त्यामुळे खबरदारी बाळगणं गरजेचं असतं.

असं नेमकं का होतं..?

सॅलरी अकाऊंट हे झीरो बॅलन्स तत्त्वावर उघडलं जातं. पण सेव्हिंग अकाऊंटचं तसं नसतं. सेव्हिंग अकाऊंटसाठी 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत किमान रक्कम ठेवणं बंधनकारक असतं. ही रक्कम जर अकाऊंटमध्ये ठेवली नाही, तर मात्र बँक पेनल्टी लावते. ही पेनल्टी जर वाढत गेली, तर अकाऊंट मायनसमध्ये तर जातंच शिवाय तुमचा सिव्हिल स्कोअरवरही परिणाम करतं. ज्याचा फटका भविष्यात तुम्हाला कर्ज घेतानाही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच वापरात नसलेलं सॅलरी बँक अकाऊंट बंद करावं, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

4 महत्त्वाची कारणं, ज्यासाठी अकाऊंटमध्ये बॅलन्स असलाच पाहिजे!

1. अनेकदा बँक आपल्या सेवांसाठी आपल्याच अकाऊंटमधून पैसे कापून घेते, त्यामुळे बँक अकाऊंट कधीच शून्यावर आणू नये.

2. वापरात नसलेलं बँक अकाऊंट तत्काळ बंद करा, अन्यथा आपल्या अकाऊंटमध्ये वेगवेगळ्या सेवांचे पैसे कापून घेत अकाऊंट मायनसमध्ये जाण्याची भीती असते.

3. अनेकदा एसएमएस, डेबिड कार्ड, एटीएम यांच्या सेवेबाबतही पैसे आपल्याच अकाऊंटमधून वसूल केले जातात. त्यावर जीएसीटीही लावला जातो. म्हणूनच अकाऊंट कधीच झिरो करु नये. अन्यथा त्याचा नाहक मनस्ताप भोगावा लागू शकतो.

4. तुमचं कोणतंही बँक खात तर मायनसमध्ये गेलं, तर ते डिफॉल्टर होऊन तुमचा सिबिल रेकॉर्डही खराब करतं. त्यामुळे वापरात नसलेली बँक खाती गोठण्याअगोदर बंद करण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

सोन्यात गुंतवणूक करावी काय? तज्ज्ञांचा हा मोलाचा सल्ला नक्की कामा येईल

वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळते; जाणून घ्या कोणकोणत्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते

कोविडमध्ये दुनिया त्रासात असताना भारतात वाढली श्रीमंतांची संख्या, वाचा सर्वेक्षणाच्या या खास गोष्टी! 

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.