LIC चा पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा एका फोनवर आयुष्यभराची कमाई गमावून बसाल

बँक ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर काही जण आता एलआयसी पॉलिसीधारकांकडे वळले आहेत. LIC alert Suspicious Phone Call

LIC चा पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा एका फोनवर आयुष्यभराची कमाई गमावून बसाल
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 10:38 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. त्याप्रमाणं फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. बँक ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर काही जण आता एलआयसी पॉलिसीधारकांकडे वळले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेत एलआयसीनं त्यांच्या सर्व पॉलिसीधारकांसाठी अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पॉलिसीधारकांनी त्यांच्या पॉलिसीची माहिती कोणत्याही फोन कॉलवर देऊ नये, असं म्हटलं आहे. (LIC issue alert regarding suspicious phone calls for surrender policy of LIC)

नेमकी कशी होतेय फसवणूक?

एलआयसीनं त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी कोणत्याही व्यक्तीनं फोन करुन विमा पॉलिीबाबत माहिती सांगेल. एलआयसीचा एजंट आहे, आयआरडीएचा अधिकारी किंवा ईएसआयसीचा कस्टमर केअर अधिकारी आहे, असं सांगून काही पॉलिसीबद्दल माहिती सांगले, त्यावर विश्वास ठेऊ नका. या प्रकारच्या फोन कॉलपासून सावध राहा, असं एलआयसीतर्फे कळवण्यात आलं आहे.

एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना फोन करुन भ्रमित केलं जात आहे. काही व्यक्ती एलआयसी अधिकारी असल्याचं भासवून ग्राहकांना फोन करतात. विमा पॉलिसीच्या फायद्याविषयी अवास्तव माहिती देतात आणि सध्या सुरु असलेली पॉलिसी सरेंडर करायला लावतात, असं देखील घडत असल्याचं एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे.

एलआयसीचं ट्विट

एक फोन कॉल आणि फसवणूक

एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार पॉलिसीधारकांना फोन करुन दुसऱ्या पॉलिसीविषयी माहिती दिली जात आहे. दुसरीकडे गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना सध्याची पॉलिसी सरेंडर करण्यास सांगितलं जात आहे. एलआयसीनं या प्रकारांना आळा घालण्यासाठी ज्या एजंटकडे आयआरडीएनं दिलेलं ओळखपत्र नसेल त्याच्याकडून पॉलिसी खरेदी करु नका, असं सांगितलं आहे.

तक्रार कुठे करायची?

तुम्हाला देखील एलआयसी एजंट असल्याचं सांगून फसवणूक करणारे फोन कॉल्स आले तर तुम्ही एलआयसीकडे co_crm_fb@licindia वर तक्रार करु शकता. पॉलिसीबद्दल दिली जाणारी माहिती LIC ची वेबसाईट www.licindia.in वर तपासून घ्या किंवा, जवळच्या LIC च्या शाखेत भेट द्या. कोणतेही फसवणुकीचे फोन आले तर जवळच्या पोलीस स्टेशलना तक्रार देखील करु शकता आणि spuriouscalls@licindia.com वर ईमेल करु शकता.

संबंधित बातम्या: LIC | एलआयसीची ग्राहकांसाठी नवी सुविधा, ‘हे’ फायदे होणार 

अवघ्या 120 रुपयांच्या बचतीवर मिळवा 27 लाख; ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवा आणि श्रीमंत व्हा )

(LIC issue alert regarding suspicious phone calls for surrender policy of LIC)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.