Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Shares : एलआयसीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांनी काय करावं?, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजारात (stock market) लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या (LIC) अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सुरुवातीला IPO गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आता रिटेल गुंतवणूकदारांना देखील तोटा सहन करावा लागत आहे.

LIC Shares : एलआयसीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांनी काय करावं?, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:21 AM

शेअर बाजारात (stock market) लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या (LIC) अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सुरुवातीला IPO गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आता रिटेल गुंतवणूकदार (Retail investors) तोंडावर पडले आहेत.एलआयसीची लिस्टिंग होऊन अडीच महिने झालेत. या कालवधीत सुमारे दोन लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणुकदार शेअर्स विकून एलआयसीमधून बाहेर पडलेत. लिस्टिंगच्या दिवशी जवळपास 39.86 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती, आता त्यांची संख्या 37.65 लाखांवर आलीये.फक्त किरकोळ गुंतवणूकदारच नाही तर परदेशी गुंतवणूकदारही LIC मधून बाहेर पडत आहेत. लिस्टिंगच्या वेळी 59 परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती आता ही संख्या 47 वर आलीये. लिस्टिंगपासूनच एलआयसीनं गुंतवणूकदारांना निराश केलंय. मग ते गुंतवणूकदार किरकोळ असो की संस्थात्मक. प्रत्येकालाच निगेटिव्ह रिटर्न मिळालाय. LIC आयपीओची इश्यू किंमत 889 रुपय ते 949 रुपये ठेवण्यात आली होती. सध्या एलआयसीच्या शेअर्सचा भाव 700 रुपयांच्याही खाली आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली

असं नाही की सर्वच गंतवणूकदार एलआयसीच्या घसरणीमुळे घाबरलेले आहेत. LIC च्या शेअर्सचा भाव कमी झाल्यानं अनेक गुंतवणूकदार पोर्टफोलिओमध्ये LIC ची हिस्सेदारी वाढवत आहेत. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पाहा. एलआयसीचा शेअर लिस्ट झाल्यानंतर 19 म्युच्युअल फंडानी गुंतवणूक केली होती आता एकूण 100 म्युच्युअल फंडांनी एलआयसीमध्ये गुंतवणूक केलीये. सामान्य गुंतवणूकदारांमधील अनुभवी गुंतवणूकदार खालच्या स्तरावर एलआयसीचे शेअर्स खरेदी करत आहेत.त्यामुळेच एलआयसीमध्ये लहान गुंतवणूकदारांची संख्या कमी झालीये. अनेक ब्रोकिंग कंपन्या खालच्या स्तरावर एलआयसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणतात?

2023-24 वर्षातील अंदाजित एंटरप्राइस व्हॅल्युनुसार एलआयसीचा शेअर्स खूप स्वस्त आहे. तसेच नवीन व्यवसायाची किंमतही अंदाजापेक्षा 34 टक्क्यांहून अधिक आहे.830 रुपयांचे लक्ष ठेऊन एलआयसीच्या शेअर्सची खरेदी करू शकता, असा सल्ला मोतीलाल ओसवाल यांनी दिलाय.  इतर विमा कंपन्यांच्या शेअर्सची तुलना करता एलआयसीचा शेअर्स सर्वाधिक स्वस्त आहे. बाजार शेअर्सला चांगली किंमतही देत नाही. तरीही बँक ऑफ अमेरिका अद्यापही एलआयसीला आऊरपरफार्मिंग रेटिंग देत आहे. त्यामुळे दीर्घकालावधीसाठी एलआयसीचा शेअर 930 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.