LIC Policy : काही दिवसांतच 50,000 पॉलिसी हातोहात विकल्या, कोणती आहे ही जबरदस्त योजना

LIC Policy : ही योजना जबरदस्त लोकप्रिय झाली आहे. या योजनेने गेल्या 10-15 दिवसातच 50000 पॉलिसी विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. केवळ एका झटक्यातच एलआयसीने हा करिष्मा केला आहे, तुमच्याकडे आहे की ही पॉलिसी?

LIC Policy : काही दिवसांतच 50,000 पॉलिसी हातोहात विकल्या, कोणती आहे ही जबरदस्त योजना
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 6:29 PM

नवी दिल्ली : जर तुम्हीही गुंतवणुकीची योजना (Investment Scheme) आखत असला तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय आयुर्विमा महामंडळावर (LIC) भारतीयांचा मोठा विश्वास आहे. या सरकारी कंपनीच्या विविध योजनांमध्ये भारतीयांची गुंतवणूक आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी, एलआयसीने एक नवीन विमा (New Insurance Scheme) योजना आणली आहे. या योजनेवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. ही योजना अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. गेल्या 10-15 दिवसांतच 50000 ग्राहकांनी ही पॉलिसी खरेदी केली आहे. एका झटक्यातच एलआयसीने हा विक्रम केला आहे. जर तुम्हाला एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही जोरदार संधी आहे.

या विमा योजनेत जमा रक्कमेवर व्याजही मिळते आणि जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. एलआयसीच्या संचालकांनी स्वतः या विमा पॉलिसीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी या पॉलिसीचे वैशिष्ट्येही सांगितले. एलआयसीने अनेक योजना ग्राहकांसाठी बाजारात आणल्या आहेत. एलआयसी प्रत्येकवेळी नवीन योजना आणत असते.

यावेळी एलआयसीच्या ‘जीवन आजाद’ (LIC Jeevan Azad Policy) योजनेने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या योजनेत ग्राहकांना जीवन विम्यासोबतच बचतीची संधीही मिळते. एलआयसीच्या या योजनेत (Plan No. 868) 5 लाख रुपयांपर्यंत विम्याची सुविधा देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

LIC ची जीवन आझाद योजना ही एक विना-सहभागी, वैयक्तिक बचत एंडोमेंट योजना आहे. योजनेत पॉलिसीधारकाला प्राप्त झालेला मॅच्युरिटी आणि डेथ क्लेम याविषयीची माहिती आणि परिभाषा अगोदरच केलेली आहे. या पॉलिसीची मॅच्युरिटी होण्याच्या 8 वर्षांपूर्वीच प्रीमियम बंद होतो.

समजा एलआयसीची योजना तुम्ही 15 वर्षांकरीता घेतली तर तुम्हाला केवळ 7 वर्षांपर्यंतच प्रीमियम भरावा लागेल. 8 वर्षे तुम्हाला हप्ता भरण्याची गरज उरत नाही. जर तुम्ही 20 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर तुम्हाला 12 वर्षांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल.

या योजनेतंर्गत कमीतकमी विमा रक्कम 2 लाख रुपये आहे. तर जास्तीत जास्त 5 लाख रुपये विमा रक्कम आहे. 3 लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी विमाधारकाला कोणतीही आरोग्य चाचणी देण्याची गरज नाही. पण त्यापुढील प्लॅनसाठी तुम्हाला मेडिकल टेस्ट करावी लागते.

या विमा योजनेत 90 दिवसाच्या मुलांपासून ते 50 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कोणी सहभागी होऊ शकते. जीवन आझाद पॉलिसीत कमीत कमी मॅच्युरिटी 15 वर्षे तर जास्तीत जास्त कालावधी 20 वर्षांचा आहे. या पॉलिसीसाठी ग्राहकांना मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. ग्राहक क्रेडिट, डेबिट कार्ड, ऑनलाईन, युपीआय अथवा धनादेशाच्या माध्यमातून एलआयसी पॉलिसीसाठी प्रीमियम भरु शकतो.

जर तुम्ही या योजनेत 28 वर्षांपासून 12,083 रुपयांचा वार्षिक हप्ता जमा कराल आणि तुमचा प्लॅन 18 वर्षांचा असेल तर मॅच्युरिटीवर 2 लाख रुपयांचा सम ॲश्युर्ड मिळेल. या योजनेत तुम्हाला 4-5% व्याज मिळेल. तर मृत्यूवेळी बेसिक सम ॲश्युर्ड अथवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट भरपाई मिळते.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.