नवी दिल्ली : इंटरनेटमुळे प्रादेशिक भाषा संपतील, सर्वांना इंग्रजीच शिकावे लागेल, असा घोष १९९० च्या दशकात केला जात होता. परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटवर इंग्रजी भाषेचे प्रमाण कमी होत असून प्रादेशिक भाषांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात क्षेत्रीय भाषेचा मजकूर इंटरनेटवर दुप्पटीने वाढला आहे.
देशात आणि जगातील प्रादेशिक भाषांमुळे इंग्रजीचा प्रभाव कमी होतोय. १९९० च्या दशकात, इंटरनेटवरील ८० टक्के सामग्री इंग्रजीत होती. ती आता घसरली आहे. आता इंग्रजीचा वाटा ५३ टक्क्यांवर वर आलाय. त्याच वेळी प्रादेशिक भाषांचा हिस्सा २० टक्क्यांवरुन वाढून ४७ टक्के गेलाय. इंटरनेटवर प्रादेशिक भाषांना आलेल्या मागणीमुळे गेल्या ७ वर्षांत अनुवादकांची संख्याही दुप्पट झालीय. फोर्ब्जच्या मते, २०२५ पर्यंत जगभरातील भाषांतर उद्योग ६ लाख कोटी रुपयांवर जाणार आहे. सध्या भाषांतर उद्यागाची उलाढाल ४.२७ लाख कोटी रुपये आहे.
मराठीचा क्रमांक दुसरा :
देशात इंग्रजी फक्त २.६ लाख लोकांची पहिली भाषा आहे. हिंदी ५३ कोटी जनतेची प्रथम भाषा आहे. इंटरनेटवर २१ कोटी लोक हिंदीचा वापर करतात. हिंदीनंतर सर्वाधिक वापर मराठीचा केला जातो. ६.६ कोटी लोक मराठीचा वापर करत आहे. गुगलच्या अहवालानुसार, देशातील ९० टक्के पेक्षा जास्त लोकांना मातृभाषेत साहित्य-सामग्री शोधायची आणि वाचायची आहे.
इंटरनेट हे जगभरातील डेटाचे जाळे आहे. आपण इंटरनेटवर शोधत असलेली सर्व माहिती कुठेतरी साठवली जाते. ते सर्व्हरद्वारे आमच्यापर्यंत पोहोचते. जगभरातून ही माहिती मिळवून, इंटरनेट सर्व्हरच्या कनेक्शनद्वारे तयार होते. जिथे माहिती साठवली जाते, त्याला सर्व्हर म्हणतात, ती 24 x7 ऑन असते. वेब होस्टिंग कंपन्या सर्व्हर सुविधा पुरवतात. जगभरातील सर्व्हर फायबर ऑप्टिक्स केबल्सद्वारे जोडलेले आहेत. केसांपेक्षा पातळ असलेल्या या केबल्समध्ये प्रचंड वेगाने डेटा ट्रान्सफर करण्याची क्षमता असते.
इंटरनेटचा जास्तीत जास्त भाग समुद्रामध्ये पसरलेल्या या केबल्समध्ये (Optical Fiber Cable) आहे. त्या तुलनेत सॅटेलाइटचे योगदान नगण्य आहे. यापूर्वी केवळ केबलद्वारे नेट कनेक्शन दिले जात होते, मात्र आता दूरसंचार कंपन्यांनी सॅटेलाइटद्वारे नेट सुविधा देणे सुरू केले आहे. हेच कारण आहे की पूर्वी इंटरनेट सुविधा फक्त टेलिफोन लाईनद्वारे प्रदान केली जात असे परंतु आज दूरसंचार कंपन्या लोकांना स्मार्टफोनमध्ये वापरण्यासाठी सॅटेलाइटद्वारे नेट वापरण्याची परवानगी देतात.
हा एक अतिशय मनोरंजक प्रश्न आहे. जर तुम्ही बाजारातून कोणताही माल घेतला तर त्याची किंमत देतो. त्या वस्तूचा मालक कोणती ना कोणती कंपनी असते. हीच गोष्ट कोणत्याही सेवेला लागू होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये वापरत असलेल्या इंटरनेटचा मालक कोण आहे?