धावत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स खाली पडलीय? घाबरू नका; हा आहे मार्ग…

रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. अशावेळी प्रत्येकाची काही ना काही वस्तू रेल्वेतून पडते. ती परत मिळत नाही. किंवा परत मिळवण्यासाठी असंख्य प्रयत्न केले जातात. कधी कधी हे प्रयत्न जीवावर बेतणारे असतात. पण कोणतेही प्रयत्न करून चालत नाही. तुम्ही आम्ही सांगितलेला मार्ग निवडल्यास तुमची कोणतीही वस्तू सहजपणे मिळू शकते. काय कराल?

धावत्या ट्रेनमधून फोन किंवा पर्स खाली पडलीय? घाबरू नका; हा आहे मार्ग...
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 9:18 PM

रोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करतात. पुरुष आणि स्त्रीयांसह लहान मुलेही रोजचा प्रवास करतात. लांबचा प्रवास असेल तर लोक रेल्वेनेच जाणं पसंत करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे खर्च कमी होतो आणि आरामात जाता येतं. लांबचा प्रवास करत असताना लोक आपला वेळ घालवण्यासाठी टाइमपास म्हणून मोबाईलवरच असतात. काही तरुण तर ट्रेनच्या पायरीवर बसून मोबाईल फोन पाहत असतात. त्यामुळे मोबाईल फोन धावत्या ट्रेनमधून पडणम्याची शक्यता असते. कधी कधी गर्दीमुळे महिलांची पर्सही पडण्याची शक्यता असते.

जर तुमचा फोन किंवा पर्स किंवा एखादी महत्त्वाची वस्तू ट्रेनमधून खाली पडली, तर तुम्ही काय कराल? अशावेळी लोक ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करतात. असा वेडेपणा कधीच करू नका. त्यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं. जी गोष्ट सहजपणे मिळू शकते, त्यासाठी जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. वस्तू खाली पडल्यानंतर सामान्यतः लोक अशा परिस्थितीत शांत बसलेले असतात किंवा ट्रेनच्या अलार्म चेनला खेचण्याचा विचार करतात. मात्र, चेन खेचल्याने इतरही समस्या उद्भवू शकतात. तरीही तुमची पर्स किंवा फोन धावत्या ट्रेनमधून पडल्यास घाबरण्याची गरज नाही. कारण धावत्या ट्रेनमधून महत्त्वाची वस्तू खाली पडल्यास ते परत मिळवण्यासाठी एक मार्ग आहे.

या सूचना पाळल्यास वस्तू मिळतील

  • ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अचानक तुमचा मोबाइल फोन खाली पडला, तर सर्वप्रथम तुम्ही रेल्वे ट्रॅकच्याकडेला असलेल्या खांबावर लिहिलेला नंबर किंवा साइड ट्रॅकचा नंबर नोट करा.
  • त्यानंतर त्वरित सहप्रवाश्याच्या फोनच्या सहाय्याने आरपीएफला आणि 182 क्रमांकावर ही माहिती द्या.
  • फोन केल्यावर तुम्हाला तुमचा फोन कुठल्या खांबाजवळ किंवा कोणत्या ट्रॅक नंबरच्या जवळ पडला हे स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे.
  • ही माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांना तुमचा फोन मिळवता येऊ शकतो. हे सर्व योग्य पद्धतीने केल्यास तुमचा फोन परत मिळवण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
  • त्वरित रेल्वे पोलिस स्थानकावर पोहोचतील आणि ते वस्तू शोधून काढतील.
  • नंतर, रेल्वे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली, तुम्ही कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यास, तुमचा मोबाइल परत तुम्हाला मिळू शकतो.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.