Pan Card : पॅनकार्ड हरवलं? झटपट असे डाऊनलोड करा E-Pan
Pan Card : तुमचे पॅन कार्ड हरवलं तर आता चिंतेचे कारण नाही. तुम्ही घरबसल्याही दुसऱ्यांदा अर्ज करु शकता आणि पॅनकार्ड मिळवू शकता. त्यासाठी ही सोपी प्रक्रिया राबवावी लागेल.
नवी दिल्ली : आधाराकार्डसारखेच भारतीय नागरिकांकडे पॅनकार्ड (Pan Card)असणे आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक व्यवहाराची जंत्री पॅनकार्डमुळे समजते. बँका कर्ज देताना पॅनकार्डची मागणी करतात. अनेक ठिकाणी पॅनकार्डची फोटोकॉपी (Photocopy)जोडणे आवश्यक आहे. पॅनकार्डवर तुमचा कायमस्वरुपी विशिष्ट क्रमांक असतो. मोठी रक्कम अथवा व्यवहार करताना तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी तुम्हाला पॅनकार्डची गरज पडते. पॅनकार्डवर अल्फान्यूमेरिक क्रमांक (Alphanumeric) असतो. हा आयकर खात्याकडून देण्यात येतो. अनेक व्यवहार यामुळे सुकर होतात. तसेच घर खरेदी, जमीन खरेदी, सोने खरेदीवेळी पॅनकार्ड मागणी करण्यात येते. तुमचे पॅन कार्ड हरवलं तर आता चिंतेचे कारण नाही. तुम्ही घरबसल्याही दुसऱ्यांदा अर्ज करु शकता आणि पॅनकार्ड मिळवू शकता. त्यासाठी ही सोपी प्रक्रिया राबवावी लागेल.
तुमचे पॅनकार्ड हरवल्यास तुम्ही घरबसल्या त्यासाठी अर्ज (PAN Card Re-apply) करु शकता. त्याआधारे तुम्ही पॅनकार्ड पुन्हा प्राप्त करु शकता. पॅन कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. अर्ज करताना तपशील द्यावा लागतो. तसेच 50 रुपये शुल्क अदा करावे लागते. त्यानंतर काही दिवसात तुमचे पॅनकार्ड घरपोच मिळते.
जर तुमचे पॅन कार्ड हरवले तर सर्वात अगोदर पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार द्या. पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्वपूर्ण कागदपत्र आहे. त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅन कार्ड हरवल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करा. त्यानंतर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज द्या.
पॅनकार्डसाठी असा करा अर्ज
- सर्वात अगोदर NSDL च्या https://www.protean-tinpan.com/ ला भेट द्या.
- Changes/Correction in Existing Pan हा पर्याय निवडा.
- आता एक स्वतंत्र पेज उघडेल. त्यावर अर्जदाराला त्याचे नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक याची माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर टोकन क्रमांक जनरेट होईल. हा अर्जदाराच्या ई-मेलवर येईल.
- त्यानंतर अर्जदाराला त्याची वैयक्तिक सविस्तर माहिती द्यावी लागले. ई-केवायसी वा ई-साईनद्वारे ही माहिती भरता येईल.
- त्यानंतर ही माहिती सत्यापित करावी लागेल.
- माहिती सत्यापित करण्यासाठी अर्जदाराला मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, इयत्ता 10 वीचे बोर्ड प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती NSDL च्या कार्यालयात पाठवाव्या लागतील.
- ई-केवायसीसाटी आधार क्रमांकाआधारे आलेला ओटीपी सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर ई-पॅन वा फिजिकल पॅन यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल.
- त्यानंतर तुमचा पत्ता भरा आणि शुल्क अदा करा.
- भारतीय नागरिकांसाठी हे शुल्क 50 रुपये तर परदेशातील नागरिकांसाठी हे शुल्क 959 रुपये आहे.
- त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात फिजिकल पॅनकार्ड मिळेल.
- ई-पॅनकार्ड अवघ्या 10 मिनिटात प्राप्त होईल. तुम्ही पॅनकार्ड डिजिटल कॉपी सेव्ह करु शकता.