Share Market : गुंतवणूकदारांनी वाटले पेढे! अवघ्या 180 दिवसांत पैसे झाले डबल

Share Market : येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना या शेअरमधून जोरदार परतावा मिळाला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे अवघ्या 180 दिवसांत दुप्पट होतील.

Share Market : गुंतवणूकदारांनी वाटले पेढे! अवघ्या 180 दिवसांत पैसे झाले डबल
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 6:32 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) रिस्क आहे. पण तुम्हाला परतावा ही तगडा मिळू शकतो. रिस्क है तो इश्क है, असे म्हणतात. शेअर बाजारातील काही स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम दुप्पट (Double Returns) होऊ शकते. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अदानी आणि अंबानी यांचे शेअर फिक्के वाटतील. शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु असले तरी अनेक असे शेअर आहेत, जे गुंतवणूकदारांना (Investors) मालामाल करत आहेत. या शेअर्संनी अत्यंत कमी वेळेत गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला आहे. सध्या या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. कमाई करणारे हे शेअर्स आहेत तरी कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना अभ्यास करावा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गुंतवणूकदारांना या शेअरमधून मोठा फायदा होण्याची आशा आहे. या शेअरमधील गुंतवणूक केल्यास जोरदार रिटर्न मिळतील. केवळ 180 दिवसांत या शेअरमधून रक्कम दुप्पट होते. विशेष म्हणजे हे स्टॉक महागडे नाहीत. हे शेअर स्वस्त आहेत. फायदा मिळवण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे स्टॉक असणे आवश्यक आहे.

गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये युको बँकेचा शेअर (UCO Bank Share) हा एक आहे. या शेअरने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 116% पेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. हा शेअर बीएसईवर सहा महिन्यांपूर्वी 11 रुपये होता. आता या शेअरची किंमत 25.30 रुपये झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत या शेअरने जवळपास 653 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरा स्टॉकही बँकेचाच आहे. या स्टॉकनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. साऊथ इंडियन बँकेच्या शेअरने (South Indian Bank Limited Share) गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 7.90 रुपये होती. तर आज 23 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 16.90 रुपये होती. या शेअरमध्ये आता तेजीचे सत्र आहे. या शेअरने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 115% हून अधिकचा फायदा मिळवून दिला. डिसेंबरच्या तिमाहीत या खासगी क्षेत्रातील बँकेने 102.7 कोटींचा नफा कमावला. तर सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेने 223 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

कर्नाटक बँकेने (Karnataka Bank) डिसेंबर 2022 मध्ये 105% निव्वळ नफा मिळवला. बँकेच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. शेअर बाजार उतरणीला लागला आहे. बाजारात प्रचंड घसरण सुरु आहे. तरीही या बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे.

सहा महिन्यांपूर्वी, 24 ऑगस्ट 2022 रोजी कर्नाटक बँकेच्या शेअरची किंमत 73.10 रुपये होती. सहा महिन्यानंतर आज, 23 फेब्रवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 138.40 रुपये झाली आहे. सहा महिन्यांतच या शेअरने गुंतवणूकदारांना 89.26% टक्के फायदा मिळवून दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.