महाराष्ट्रातात गॅस सिलिंडरचा दर हजारपार?, जाणून घ्या अन्य राज्यांच्या तुलनेत कमी की जास्त
महाराष्ट्रासहित देशातील प्रमुख शहरांत गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतींनी हजारांचा टप्पा पार केला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दरवाढीमुळे दिल्लीतील सिलेंडरच्या किंमती 999.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेला तीव्र महागाईचा सामना (Inflation level) करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेल सोबत घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती (Cylinder Price) गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या सिलिंडर वरील अनुदान थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित देशातील प्रमुख शहरांत गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतींनी हजारांचा टप्पा पार केला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दरवाढीमुळे दिल्लीतील सिलेंडरच्या किंमती 999.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यासोबत बिहारमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीनी एक हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात गॅस सिलिंडरच्या भावात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
..हॉटेलचं जेवण महागणार
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 मे ला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 2,355 रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे हॉटेलच्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर भाववाढीचा दुहेरी फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला आहे.
निवडणुकीनंतर भाववाढीचा झटका
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेचा रोषाचा सामना टाळण्यासाठी इंधनात कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात आली नव्हती. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी 22 मार्चला घरगुती घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. यामध्ये बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विना-अनुदानित 14.2 किलो सिलेंडरचा भाव एक हजार रुपयांच्यावरील पोहोचला.
एका वर्षात शंभर रुपयांची वाढ
राजधानी दिल्लीत एका वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 190.50 रुपयांनी वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किंमती 999.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या एक वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 130.50 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच यावर देण्यात आलेले अनुदान बंद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील घरगुती गॅस सिलिंडरचे भाव
· मुंबई- 999.50
· अहमदनगर-1013
· अकोला-1020
· अमरावती-1033
· औरंगाबाद-1008.50
· भंडारा-1060
· नागपूर-1051
· नाशिक-1003
· पुणे-1002.50