नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन व्यवसायाचा जमाना आहे. कोरोना महामारीतील लॉकडाउन आणि कर्फ्युमध्ये ऑनलाईन व्यवसाय तेजीत दिसला. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन राहून पैशांची कमाई करू शकता. जर तुम्ही स्वतःची वस्तू बनवाल किंवा दुसऱ्याकडून माल घेऊन तो विकू इच्छित असाल, तर आम्ही माहिती देत असलेला ऑनलाईन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे. यासाठी तुम्हाला काही काम करावे लागेल, यात सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आपली वेबसाईट बनवावी लागेल. या माध्यमातून तुम्ही मालाची जाहिरात करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत आपला माल पोहोचवाल. तुम्ही मालाची गुणवत्ता, किंमत अशा महत्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्या, जेणेकरून खरेदीसाठी आपल्या वेबसाईटकडे वळलेला ग्राहक पुन्हा दुसऱ्या वेबसाईटकडे वळणार नाही. (Make a lot of money from online business; know these seven tips)
सर्वात आधी तुम्ही व्यवसायात यशस्वी होण्याचा मार्ग तयार करा आणि आपण काय बनवायचे ते जाणून घ्या. तुमचे ग्राहक कोणत्या प्रकारचे आहेत, याचा पूर्णपणे अभ्यास करा. हे सर्वात महत्त्वाचे आणि पहिले पाऊल असते. व्यवसायात येणाऱ्या चढ-उतारामध्ये पूर्वाभ्यास फार महत्वाचा असतो.
काम पूर्ण ऑनलाईन करायचे आहे. डोमेनशिवाय काही होणार नाही हे लक्षात घ्या. डोमेन घेतल्यानंतर आपल्या ऑनलाईन व्यवसायाची नोंदणी करा आणि सुरुवात करा.
डोमेन लेन घेतल्यानंतर तुम्हाला वेब होस्टिंग घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही ऑनलाईन व्यवसायाचा सेट अप उभा करू शकाल. हे काम मोफत देखील करू शकता. कारण इंटरनेटच्या विश्वात अनेक कंपन्या मोफत वेब होस्टिंग उपलब्ध करतात. मोठा बिझनेस करायचा असेल तर मात्र फुकटचे घेऊ नका, यासाठी काही पैसे खर्च करून खरेदी करा.
ऑनलाईन व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तुमची वेबसाईट आकर्षक ठेवा. तुमच्या सेवा आणि विक्रीला ठेवलेल्या प्रोडक्टचे मार्केटिंग आपल्या स्वतःच्या वेबसाइटवरून करा. वेबसाईट आकर्षक असू द्या, मात्र ती हाताळणे सोईचे असायला हवे, याची खबरदारी घ्या.
जगातील कोट्यवधी लोक इंटरनेटवर काही ना काही शोधत असतात. लोकांना खरेदी करण्यापूर्वी आवश्यक प्रोडक्टचा आधी गुगलवर शोध घेण्याची सवय लोकांना लागली आहे. ग्राहकांच्या या शोध मोहिमेची आयडिया तुम्हाला आली कि तुम्ही ऑनलाईन व्यवसायात सहजपणे पाय रोवू शकता.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची पुरेशी माहिती ठेवावी लागेल. जेणेकरून तुम्ही अधिकाधिक ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आकर्षक करू शकता. तुम्ही तुमची वेबसाइट आणि आपल्या प्रोडक्टची ऑनलाइन मार्केटिंग करा. याच माध्यमातून तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल.
फेसबुक, ट्वीटर किंवा अन्य सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा तुमच्या ऑनलाईन व्यवसायात फार उपयोग होऊ शकतो. तुमच्या प्रोडक्टचा अधिकाधिक प्रसार कारणासाठी तुम्ही सोशल मीडियाचा पुरेसा आधार आणि वापर करून घ्या. (Make a lot of money from online business; know these seven tips)
Corona Vaccine: ‘देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणाhttps://t.co/1RmHqT7Ave#RahulGandhi #NarendraModi #CoronaVaccine #Vaccination @INCMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2021
इतर बातम्या
Realme चा पहिला टॅब्लेट लाँचिंगसाठी सज्ज, आकर्षक डिझाईनसह जबरदस्त फीचर्स मिळणार