नवी दिल्ली : शेअर बाजारात सुरुवातीच्या तासांत बँकिंग शेअर्सचा (BANKING SHARES) दबदबा राहिला. मात्र, काही वेळानंतर कामगिरीमध्ये दिसून आली. आज (मंगळवारी) सेन्सेंक्स आणि निफ्टी सरासरी 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेंक्स वर 23 आणि निफ्टी पर 43 स्टॉक्सची कामगिरी सरासरी राहिली. त्यामुळे सेन्सेंक्स 554.05 अंकांच्या घसरणीसह 60,754.86 आणि निफ्टी 195.05 अंकांच्या घसरणीसह 18,113.05 अंकांवर बंद झाला. आज सेन्सेंक्समध्ये बँकिंग क्षेत्राची सरासरी कामगिरी नोंदविली गेली. केवळ स्टेट बँक (STATE BANK OF INDIA) आणि इंड्सइंड बँकेत घसरण दिसून आली. निफ्टीच्या सर्व क्षेत्रांचे निर्देशांकांची कामगिरी निराशाजनक राहिली. सर्वाधिक घसरण निफ्टी रियल्टीमध्ये दिसून आली आणि 2.61 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी ऑटोमध्ये 2.38 टक्के आणि निफ्टी मेटल (NIFTY METAL) मध्ये 2.26 टक्के घसरण झाली. निफ्टी बँकमध्ये 0.02 टक्के घसरण नोंदविली गेली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीची लाट होती. मात्र, आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी) मार्केटच्या तेजीला ब्रेक लागला. आगामी अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. नवी कर संरचना तसेच बँकिंग क्षेत्रातील नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा धारण केल्याचे चित्र आहे. सरकारी बँकेत परकीय गुंतवणूक मर्यादा 20 टक्क्यांवरुन 74 टक्के करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.
‘सॅमको सिक्युरिटिज’चे इक्विटी रिसर्च हेड येशा शाह यांच्या मते, कोविड प्रकोपाच्या काळात ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेअर्स बाजारातून मिळणाऱ्या अनुकूल परिणामांमुळे गुंतवणुकीचा कल अधिक दिसून येत आहे. तरुण वयोगटातील गुंतवणूकदारांचे यामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. यूट्यूब किंवा सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे शेअर बाजार तज्ज्ञ म्हणण्यांचे प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
स्वत:च्या फायद्यांसाठी सर्वसामान्यांची पुंजी मातीमोल करणाऱ्या फसव्या गुंतवणूक तज्ज्ञांपासून दूर राहण्याचे आवाहन सेबीने केले आहे. सोशल मीडियावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पैसे गुंतवणूक करणे टाळायला हवे. पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी स्वत: संशोधन करावे किंवा सेबीद्वारे मान्यताप्राप्त सल्लागारांचा मदत घ्यावी.
• अॅक्सिस बँक (1.83%)
• एचडीएफसी बँक (0.53%)
• कोटक महिंद्रा बँक ( 0.48%)
• डॉ.रेड्डी लॅब्स (0.25%)
• टायटन कंपनी (0.04%)
• टाटा कझ्युमर्स प्रॉडक्ट्स (-4.40%)
• मारुती सुझुकी (-4.24%)
• अल्ट्रा-टेक सिमेंट (-3.90%)
• आयसर मोटर्स (-3.80%)
• टेक महिंद्रा (-3.58%)
Gold Import | कोरोना काळातही सोन्याची आयात दुप्पट, भारतीय ग्राहकांची रेकॉर्डब्रेक खरेदी
दर महिन्याला गुंतवा 1,411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपयांचा परतावा