Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Inflation : दुध पावडरचे दर दुपटीने वाढले, दूध टंचाईचा मोठा फटका

सध्या राज्यात दुधाची टंचाई जाणवत असून, दुधाच्या उत्पादनात सरासरी 15 ते 20 टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी दुधापासून तयार होणाऱ्या सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे.

Inflation : दुध पावडरचे दर दुपटीने वाढले, दूध टंचाईचा मोठा फटका
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 8:33 AM

मुंबई : राज्यासह देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. इंधनाच्या (Fuel) दरात मोठी वाढ झाली आहे. खाद्य तेलापासून ते आगपेटीपर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढल्याने घर चालवताना गृहिनींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता दर वाढीचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे दूधाच्या (Milk) टंचाईमुळे दूध पावडरचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वी दूध पावडरची किंमत प्रति किलो 125 ते 150 रुपये होती. ती आता तब्बल 350 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसांत दूध पावडरचे दर दुपटीने वाढले आहेत. तर बटरचे दर देखील वाढले असून, बटर 450 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. तसेच दूध टंचाईमुळे दूधाचे देखील दर वाढले असून, ग्राहकांना याची आर्थिक झळ बसत आहे.

उन्हाळ्यामुळे दुधात घट

राज्यात दररोज सरासरी दीड कोटी दूधाचे उत्पादन होते, त्यापैकी एक कोटी 20 लाख लिटर दूध विविध दूध डेअरी आणि पाऊचच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचते. तर उर्वरित दूधाचे बटर, दही, ताक, अशा उत्पादनासोबतच पावडर तयार केली जाते. मात्र यंदा उन्हाचा कडाका सरसरीपेक्षा थोडा जास्तच असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम हा दूध उत्पादनावर देखील झाला आहे. दूध देणाऱ्या प्राण्यांना खाण्यासाठी हिरवा चारा उलब्ध नसल्याने दूधाच्या प्रमाणत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दूधाचे उत्पादन 15 ते 20 टक्के म्हणजेच अंदाजे 30 लाख लिटरने घटले आहे.

दूध टंचाईमुळे भाव वाढले

सध्या राज्यात दुधाच्या उत्पादनात तीस लाख लिटरचा तुटवडा जाणवत असल्याले केवळ दूध आणि दूधाच्या पावडरचेच नाही तर दूधापासून बनणाऱ्या इतर पदार्थांचे दर देखील वाढले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दूधाता तुटवडा सध्या अधिक जाणवत आहे. दूध पावडरच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. सोबतच दूध, दही, बटर, या पदार्थांच्या दरात देखील वाढ झाली आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.