Employees | 4 दिवसांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंपर गिफ्ट..नियमांत लवकरच बदल
Employees | देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नियमातील बदलामुळे त्यांना हा फायदा होईल..
नवी दिल्ली : देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नियमातील बदलांमुळे (Rule Change) त्यांना हा फायदा होईल. पण काय आहे हा बदल त्याची माहिती घेऊयात. लवकरच केद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी न्यूनत्तम सेवा शर्तींच्या अटी आणि नियमात बदल केला आहे. त्यासंबंधीची एक अधिसूचना विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना त्याचा फायदा होणार आहे.
केंद्र सरकार देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्संना महागाई भत्ता देण्याची तयारी करत आहे. कर्मचाऱ्यांनाही जुलै महिन्यांपासून महागाई भत्त्याची प्रतिक्षा आहे. या 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीत कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी न्यूनत्तम सेवा शर्ती (Minimum Qualifying Services) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम सातव्या वेतन आयोगाच्या पे बँड आणि ग्रेडसाठी लागू होतील.
प्रमोशनच्या नियमात बदल झाल्यामुळे आता श्रेणी 1 आणि श्रेणी 2 साठी 3 वर्षांची सेवा महत्वाची आहे. श्रेणी 6 ते श्रेणी 11 साठी 12 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. श्रेणी 7 आणि श्रेणी 8 साठी कमीत कमी दोन वर्षांची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.
जुलै 2022 साठी महागाई भत्ता (DA) मिळावा यासाठी तयारी करण्यात आली आहे. भत्ता जाहीर झाल्यास तो 1 जुल 2022 रोजीपासून लागू मानण्यात येईल. डीए लागू करायचा असेल तर सरकारला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एरियस ही द्यावा लागेल.
महागाई रेकॉर्डवर रेकॉर्ड तोडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 4 टक्क्यांचा महागाई भत्ता मिळण्याची आशा आहे. त्यामुळे महागाई भत्ता 34 टक्क्यांहून 38 टक्के होईल.