Credit Card : क्रेडिट कार्ड पेमेंटला झाला उशीर, कामी येईल ही ट्रिक, दंडासाठी एक रुपया पण नाही भरण्याची गरज

Credit Card : क्रेडिट कार्ड गरजेच्यावेळी अत्यंत उपयोगी ठरते. पण त्याचे बिल वेळेत नाही भरले नाही तर एक सवलत मिळते, याविषयीचा आरबीआयचा नियम तुम्हाला माहिती आहे का?

Credit Card : क्रेडिट कार्ड पेमेंटला झाला उशीर, कामी येईल ही ट्रिक, दंडासाठी एक रुपया पण नाही भरण्याची गरज
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 4:40 PM

नवी दिल्ली : देशातील एक मोठा वर्ग त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करतो. आता क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, अनेकदा बिल भरण्यास उशीर होतो, अथवा रिमांडर सेट नसल्याने, दुर्लक्ष केल्याने वेळेत हे बिल भरल्या जात नाही. त्याचा फटका लागलीच दिसून येतो. ग्राहकांना जबरी दंड भरावा लागतो. त्याच्या सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही क्रेडिट कार्डचे (Credit Card Bill Payment) बिल निर्धारीत वेळेच्या आता भरले तर, मात्र तुम्हाला कुठलाही दंड भरावा लागत नाही.

अनेकदा काही कारणांमुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची आठवण राहत नाही. वेळेत ते बिल अदा करत नाही. त्याचा परिणाम सिबील स्कोअरवर होतो. सातत्याने हे घडत राहिले तर बँक क्रेडिट कार्डच्या लिमिटविषयी निर्णय घेऊ शकते. पण यासंबंधीचा आरबीआयचा नियम तुम्हाला माहिती आहे का?

तर नाही द्यावी लागत पेनल्टी क्रेडिट कार्ड बिल पेमेंटबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नियम लागू केला होता. त्यानुसार, बिल पेमेंट करण्यासाठी निर्धारीत वेळेनंतर काही दिवसांचा कालावधी देण्यात आला. आरबीआयच्या या नियमामुळे ग्राहकांना कमालीचा फायदा झाला. त्यांना 3 दिवसांपर्यंत कोणतेही विलंब शुल्क न भरता क्रेडिट कार्डचे बिल अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे ड्यू डेट विसरली तरी पुढील तीन दिवसांत क्रेडिट कार्डधारकाला बिल अदा करता येते.

हे सुद्धा वाचा

3 दिवस क्रेडिट स्कोअरवर परिणाम नाही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर तुम्ही निर्धारीत वेळेनंतर पुढील 3 दिवसांपर्यंत क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करु शकता. त्यासाठी तुम्हाला पेनल्टी देण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर पण प्रभावित होणार नाही. अशावेळी तुम्ही एखाद्या महिन्यात निर्धारीत तारखेला क्रेडिटे कार्डचे पेमेंट करण्याचे विसरलात तरी पुढील तीन दिवस तुमच्या हातात असतात.

तर मात्र इतका भूर्दंड जर सवलतीनंतर पण ग्राहकांने, क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने बिल पेमेंट केले नाही तर कंपनी त्याच्याकडून दंड वसूल करु शकते. ही रक्कम क्रेडिट कार्डच्या बिलावर अवलंबून असते. जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल अधिक असेल तर जादा दंड द्यावा लागेल. प्रत्येक बँकांचा दंड वसूल करण्याचा नियम वेगळा आहे. काही बँका 500 ते 1 हजार रुपयांच्या बिलावर 400 रुपये दंड वसूल करतात. 1 हजार ते 10 हजार रुपयांच्या रक्कमेवर 750 रुपये आणि 10 हजार ते 25 हजार रुपयांच्या बिलावर 950 रुपयांपर्यंत दंड आकारते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.