Debit Card : मोदी सरकारचा मोठा निर्णय, रुपे डेबिट कार्ड, युपीआय व्यवहारांवर आता होणार बंपर फायदा, ग्राहकांना देणार सूखद धक्का
Debit Card : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळणार.
नवी दिल्ली : ऑनलाईन व्यवहारांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आता मोदी सरकारने (Modi Government) आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) आणि भीम-युपीआय व्यवहारांना (BHIM UPI Transaction) अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ (Incentive) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापारकर्त्यासह व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने त्यासाठी एकूण 2,600 कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक संबंधाच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) याविषयीची एक बैठक घेतली. या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्कर यादव यांनी या योजनेची मीडियाला माहिती दिली.
भीम-युपीआयद्वारे कमीत कमी व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना आणि रुपे डेबिट कार्डचा वापर करणाऱ्यांना इन्सेटिव मिळणार आहे. त्यांना व्यवहारात देवाण-घेवाण करावी लागणार आहे. अर्थात ही सर्व प्रक्रिया बँकांमार्फत राबविण्यात येणार आहे.
योजनेनुसार, बँकांना चालू आर्थिक वर्षांत Rupay आणि UPI चा वापर केल्यास पॉईंट ऑफ सेल (PoS) आणि ई-कॉमर्स व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेटिव देण्यात येणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.
भीम-युपीआय आणि रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पेमेंट्स प्लॅटफॉर्म वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. त्यासाठीच ग्राहकांना इन्सेटिव देण्याचा विचार पुढे आला आहे.
ही योजना केवळ स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मर्यादीत नाही. तर UPI लाईट आणि UPI123PAY चे वापरकर्त्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि रोखीतील व्यवहार कमी होतील.
UPI व्यवहारांनी सरत्या वर्षात डिसेंबर 2022 महिन्यात एकूण 12.82 लाख कोटी रुपये मूल्यांसह 782.9 कोटी डिजिटल व्यवहारांचा विक्रम केला आहे. जगभरात भारतीय युपीआय व्यवहारांची जोरदार चर्चा आहे. काही देशात भारतीय युपीआयचा लवकरच बोलबोला होणार आहे.