Government Portal : आता नको सरकारी कार्यालयाच्या येरझरा! या वेबसाईटवर घरबसल्या 13,000 हून अधिक सेवा मिळवा

Government Portal : सरकारी काम आणि दहा दिवस थांबा, या प्रतिमेला केंद्र सरकारने छेद दिला आहे. आता या सरकारी संकेतस्थळावर तुम्ही घरबसल्या 13,000 हून अधिक कामे करु शकता.

Government Portal : आता नको सरकारी कार्यालयाच्या येरझरा! या वेबसाईटवर घरबसल्या 13,000 हून अधिक सेवा मिळवा
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 8:35 PM

नवी दिल्ली : नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारची, राज्य सरकारची अनेक संकेतस्थळे (Websites) उपलब्ध आहेत. आता तर खाते, विभाग, महामंडळे यांच्या वेबसाईट सुरु झाल्या आहेत. पण केंद्र सरकारने (Central Government) एक खिडकी योजनेसारखीच, एक वेबसाईट तयार केली आहे. या संकेतस्थळावर तुम्ही एक नाही तर अनेक कामे करु शकता. ते पण घरबसल्या, त्यासाठी तुम्हाला सरकार कार्यालयाच्या येरझरा, चकरा मारण्याची गरज नाही. अनेकदा सरकारी कार्यालये मोठं-मोठ्या शहरात असतात. गावकुसाकडून तिथं जाणं, राहणं जिकरीचं ठरतं. त्यामुळे आता अनेक कामे तुम्ही ऑनलाईन करु शकता. त्यासाठी सरकारी कार्यालयाची उंबरठे झिजविण्याची गरज नाही.

13,000 हून अधिक सेवा सरकारी योजना आणि सरकारच्या अख्यत्यारीतील काही सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपयोगी ठरली आहे. यामाध्यमातून अनेक कामे करता येतात. पण नागरिकांना विविध संकेतस्थळांची योग्य माहिती नसते. त्यामुळे केंद्र सरकारने विविध राज्ये आणि केंद्रातील सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी एक संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यावर तुम्ही सहज 13,000 हून अधिक सेवांचा लाभ घेऊ शकता. या सर्व सेवा तुम्हाला घरबसल्या मिळविता येतात.

कोणती आहे वेबसाईट services.india.gov.in या संकेतस्थळावरुन तुम्ही सर्व कामे करु शकता. या संकेतस्थळावर कोणत्याही भारतीय नागरिकाला 13,350 सेवांचा लाभ घेता येईल. तुम्हाला आधार-पॅन कार्ड लिंक करता येईल. सरकारच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. कराची माहिती घेता येईल. तुमचे जन्म प्रमाणपत्र तयार करता येईल. या संकेतस्थळावर तुमची कामे पटापट होतील. त्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

काय काय आहेत सुविधा या सरकारी पोर्टलवर अर्थमंत्रालयाच्या 121 सेवा, पेट्रोलियम मंत्रालय आणि नैसर्गिक गॅस खात्याच्या 100 सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या 72 सेवा, पेन्शनसंबंधीच्या 60 सेवा, शिक्षण मंत्रालयाच्या अख्त्यारीतील 46 सेवा, अल्पसंख्याक खात्याच्या 39 सेवा, इतर अनेक विभागाच्या सेवा तुम्हाला या वेबसाईटवर मिळतील.

ही आहे पद्धत तुम्हाला कोणते ही काम करायचे असेल, सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर services.india.gov.in या संकेतस्थळावर जा. त्यानंतर उजव्या बाजुला असलेले ऑल कॅटेगिरी निवडा. त्यानंत जी सेवा तुम्हाला हवी आहे. त्यावर क्लिक करा. याठिकाणी पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर सेवेची भली मोठी यादी समोर येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करा. आवश्यक कागदपत्र जोडा. तुमचे काम काही दिवसातच होईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.