EPF की PPF यातच अडकलात! रिटायरमेंटसाठी ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 60 वर्षानंतर मिळतील 3.5 कोटी

सेवानिवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडाचाही पर्याय उत्तम मानला जातो. यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. (Mutual fund investment for retirement get 3 5 crore at age of 60 by investing SIP)

EPF की PPF यातच अडकलात! रिटायरमेंटसाठी 'या' योजनेत गुंतवा पैसे, 60 वर्षानंतर मिळतील 3.5 कोटी
Rupee
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:03 AM

मुंबई : सेवानिवृत्तीनंतर लोकांना बर्‍याचदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत योग्य वेळी योग्य योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात आपल्या गरजा भागविण्यास अडचण उद्भवणार नाही. सेवानिवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यासाठी ईपीएफ epf आणि पीपीएफ ppf चा पर्याय निवडला जातो. यासोबतच अनेकजण एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेचाही विचार करतात. मात्र सेवानिवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडाचाही पर्याय उत्तम मानला जातो. यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. (Mutual fund investment for retirement get 3 5 crore at age of 60 by investing SIP)

म्युच्युअल फंडबाबत असलेल्या बाजाराच्या जोखीमेबाबत जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही त्यावर सहज मात करुन त्या निधीचा एक स्वतंत्र पोर्टफोलिओ तयार करु शकता. यामुळे जोखीम बऱ्यापैकी कमी होऊन परताव्याचे प्रमाण वाढते. म्युच्युअल फंडामध्ये 20-30 वर्षे गुंतवणूक करुन त्यानंतर एसआयपीद्वारे त्यात गुंतवणूक केल्यास निवृत्तीसाठी तुम्ही एक विशिष्ट रक्कम जोडू शकता.

म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर

सध्या महागाईचा दर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यानुसार बँकांमध्ये किंवा एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होत नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करताना 10 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळतील तिकडेच पैसे गुंतवावे, असा सल्ला दिला जातो. या सल्ल्यानुसार तुम्ही ईपीएफ किंवा पीपीएफमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरु शकते.

60 वर्षात 3.50 कोटी रुपये जमा

समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुम्ही 10,000 रुपयांमधून मासिक एसआयपी सुरू केली. त्यात तुम्ही 12 टक्के परताव्यानुसार 30 वर्षे पैसे जमा केले तर तुम्ही 60 वर्षाचे असताना तुमच्याकडे 3.50 कोटी रुपयांची रक्कम जमा असेल. यानुसार काही छोट्या जोखीम सोडली तर तुम्हाला एक रक्कमी मोठा परतावा मिळू शकतो.

एसआयपीद्वारे परताव्याव्यतिरिक्त बरेच मोठे फायदे देखील मिळतात. एसआयपीमध्ये आपण तुम्ही कमीत कमी पैशांपासून जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. त्यावर कोणतेही बंधन नाही. जर तुम्हाला तुमचा सेवानिवृत्ती निधी अधिक मजबूत करायचा असल्यास तुम्ही त्यात इक्विटी आणि डेट प्लॅन तुमच्या सोयीनुसार बदलता येऊ शकते. यामुळे म्युच्युअल फंडांमध्ये जोखीम कमी होते आणि परतावा वाढतो.

आणखी बरेच फायदे

सेवानिवृत्ती निधीसाठी म्युच्युअल फंडांचा आणखी मोठा फायदा आहे. तुम्ही केलेल्या सेवानिवृत्ती निधीसाठी म्युच्युअल फंडांमधून कमाईवर कर वाचवू शकता. त्यासाठी आपल्याला इक्विटी लिंक्ड बचत योजना ELSS घेण्याची आवश्यकता असेल. ज्याद्वारे तुम्ही तुमचा कर वाचवू शकता.

ELSS ही पूर्णपणे कर बचत योजना आहे ज्यावर आयकर कलम 80 सी अंतर्गत सवलत देण्यात येते. पेन्शन योजनांच्या तुलनेत म्युच्युअल फंड सेवानिवृत्तीमध्ये अनेक सुविधा देतात. पेन्शन योजनांमध्ये पैसे घेण्यावर अनेक प्रकारचे निर्बंध आणि नियम आहेत. म्युच्युअल फंडामध्ये आपण पूर्ण किंवा आंशिक पैसे काढू शकता. तसेच जर तुम्ही इच्छित असाल तर तुम्हाला गुंतवणूक थांबवताही येते किंवा गरज असल्या दुसऱ्या म्युच्युअल फंडावर ती ट्रान्सफरही करता येते.

(Mutual fund investment for retirement get 3 5 crore at age of 60 by investing SIP)

संबंधित बातम्या : 

रेशनकार्डमध्ये चुकीचा नंबर असेल तर तो त्वरित करा अपडेट, अन्यथा मोठा तोटा, जाणून घ्या…

7th Pay Commission: सणांच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, थेट 30 हजारांपर्यंत पगार वाढणार

पीएम केअर फंडमध्ये पैसे दिल्यास आयकरात मिळेल सूट, जाणून घ्या प्रक्रिया आणि बचत पद्धती

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...