Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Personal Loan | या कामासाठी कधीच घेऊ नका वैयक्तिक कर्ज, व्याज भरतानाच होईल दमछाक

Personal Loan News| अडचणीच्या काळात कर्ज काढावे लागते. पण वैयक्तिक कर्ज काढताना या कामासाठी ते कधीच काढू नका. कारण हप्ते फेडतानाच तुमची दमछाक होईल.

Personal Loan | या कामासाठी कधीच घेऊ नका वैयक्तिक कर्ज, व्याज भरतानाच होईल दमछाक
या कामासाठी नको कर्जImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 12:27 PM

Personal Loan News| सध्या दिवसभरात कमीत कमी दोन फोन तर वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज (Vehicle Loan), गृहकर्ज (Home Loan) वा क्रेडिट कार्ड (Credit Card) विषयी नक्कीच असतात. आता तुम्हाला वाटेल की, एकीकडे कर्ज देण्यासाठी अर्थसंस्था आणि बँका (Bank) तयार असताना आणि कुठलंही तारण (security Amount) मागत नसताना मग ही संधी कशाला सोडायची? अशाच विचारात अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात. कमी कागदपत्रांची पुर्तता करावी लागते आणि अगदी थोड्याच वेळात कर्जाची रक्कम खात्यात जमा होत असल्याने अनेक जण या आमिषाला बळी पडतात. पण गरज नसताना फक्त चैन खातर घेतलेले हे कर्ज फास ठरते. हप्ते फेडण्यात आणि मोठ्या व्याजामुळे तुमच्याकडून अव्वाच्या सव्वा रुपये वसूल केल्यानंतर पश्चातापाशिवाय वा मनस्तापाशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. तेव्हा या ऑफर्सला (Offers) बळी पडण्यापूर्वी तुमची गरज काय नी तुमच्याकडे पैशांची आवक कशी राहिल याचाही विचार करा.नाहीतर भूर्दंड तर बसेलच पण मनस्ताप सहन करावा लागेल तो वेगळाच

वैयक्तिक कर्ज असूरक्षित वर्गात

आवश्यक सर्व कामांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो. गाडी घ्यायची असेल तर कार लोन, घर घ्यायचं असेल तर गृहकर्ज, अभ्यास करायचा असेल तर एज्युकेशन लोन खरेदी करावं लागतं. याशिवाय बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. हे एक अतिशय असुरक्षित कर्ज आहे. बाकीच्या कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जही खूप महाग आहे. म्हणजेच हे कर्ज जास्त व्याजदराने मिळतं. सध्या पर्सनल लोनचा व्याजदर 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे काही कामासाठी पर्सनल लोन न घेण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.

सिबिल स्कओर हवा चांगला

पर्सनल लोन घेण्यासाठीही तुम्हाला बँकेतून फोन येतील. यामध्ये तुम्हाला प्री-अप्रूव्ह्ड लोन ऑफर केलं जातं. त्यासाठी सुरक्षितता म्हणून सोने, घर किंवा गाडी आदी गहाण ठेवण्याची गरज पडत नाही. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला हे कर्ज सहज मिळतं. याच कारणामुळे अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात. हे कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने अनेक जण हा पर्याय निवडतात.

हे सुद्धा वाचा

डाऊन पेमेंटसाठी नका घेऊ कर्ज

अनेकदा मालमत्ता खरेदी करताना डाउन पेमेंट करण्यासाठी लोक वैयक्तिक कर्ज घेतात. तज्ज्ञ हा प्रकार टाळण्याचा सल्ला देतात. मालमत्ता खरेदीच्या गरजेनुसार वैयक्तिक कर्जांना फीचर्स मिळत नाहीत. त्याचबरोबर त्याचा व्याजदरही बऱ्यापैकी चढा असतो. वैयक्तिक कर्ज खूप महाग असतात. त्यामुळे अशा कामासाठी कर्ज काढू नका.

कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता

अनेक वेळा क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी बरेच जण पर्सनल लोन घेतात. पण हा पर्याय ही चुकीचा आहे. व्याजदर महाग असल्याने तुम्हाला क्रेडिट कार्ड भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेणे नुकसानदायक ठरतं. विशेष म्हणजे एकदाही हप्ता चुकवला तर बोजा वाढू शकतो. त्याचबरोबर तुमची सिबिलही खराब होईल. तुम्ही कर्जाच्या जाळ्यातही अडकू शकता.

कर्ज काढून मौज नकोच

छंद पूर्ण करण्यासाठी कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नये. महागडे मोबाइल आणि महागड्या ठिकाणांना भेट देण्यासाठी कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नका. तसेच वैयक्तिक कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू नका. गृहकर्ज किंवा कार लोन घेतलं तर तुमच्याकडे भांडवल असतं. जे विकून तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता. समजा तुम्ही पर्सनल लोन घेऊन कुठेतरी फिरायला गेलात आणि नंतर तुम्हाला ते फेडताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही कर्जाच्या सापळ्यात वाईट प्रकारे अडकू शकता.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.