Ayushman : तुमचा हेल्थ डाटा आता एकदम सुरक्षित, केंद्र सरकारने सुरु केली ही सुविधा, होईल असा फायदा..
Ayushman : तुमच्या आरोग्याची माहिती आता एकदम सुरक्षित राहणार आहे..
नवी दिल्ली : जर तुमच्याकडे आयुष्यमान भारतचे (Ayushman Bharat) कार्ड असेल तर तुमच्या आरोग्याची माहिती (Health Information) आता जतन करुन ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी डिजिटल प्रक्रियेचा आधार घेण्यात आला आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित माहितीचे डिजिटलयाझेशन (Digitalization) करण्यात येणार आहे. त्याचा अनेक ठिकाणी तुम्हाला फायदा होईल.
आरोग्य योजनांशी जोडलेल्या सदस्यांचा हेल्थ रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित करण्यात येणार आहे. यासंबंधी डिजीलॉकरचा ही ते लाभ घेऊ शकता. डिजीलॉकरचा (Digi locker) उपयोग करुन त्याठिकाणी तुम्हाला दस्तावेज जतन करुन ठेवता येतील.
आरोग्य मंत्रालयानुसार, डिजीलॉकरच्या वापरकर्त्यांना आरोग्य रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित ठेवता येणार आहे. ते आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) डिजीलॉकरला जोडू शकतात. डिजीलॉकरमुळे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन(ABDM) सोबतच इतर कागदपत्रेही जोडता येतात.
डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत दस्ताऐवज एकीकरणासाठी उपयोगी ठरू शकते. तुमची कागदपत्रे या ठिकाणी जतन करुन ठेवता येतात. तसेच आरोग्य सुविधांसाठी या कागदपत्रांची पुर्तता करता येते. अनेक ठिकाणी ही कागदपत्रे उपयोगी ठरतात.
डिजीलॉकरचे सुरक्षित क्लाउड आधारित स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये वापरकर्त्याच्या लसीकरण नोंदी, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, प्रयोगशाळा अहवाल, रुग्णालयातील सुट्टी यांची माहिती यामध्ये नोंदणी करता येते. वेळेवर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरते.
आयुष्मान भारत आरोग्य खातेधारकाचे विविध आरोग्य रेकॉर्ड यामध्ये नोंद ठेवले जातात. आयुष्मान भारत डिजिटल मिशन नोंदणीकृत आरोग्य सुविधा रुग्णालये आणि प्रयोगशाळा यातंर्गत जोडली जाणार आहेत.
वापरकर्त्यांना या अॅपवर त्यांचे जूने आरोग्य रेकॉर्ड स्कॅन करुन अपलोड करता येतात. या सुविधेचा 13 कोटी वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. भविष्यात डिजीलॉकरच्या मदतीने उपचारासाठी ही कागदपत्रे आपोआप प्राप्त होतील.