उन्हातान्हात किती दिवस बायको, मुलांना बाईकवर फिरवणार? 1 लाखात घरी आला नवी कोरी कार, EMI देखील खिशाला परवडणारा

मारुती सुझुकीने नुकतीच आपली नवीन डिझायर सेडान भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. तुम्ही तीला केवळ एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकता.

उन्हातान्हात किती दिवस बायको, मुलांना बाईकवर फिरवणार? 1 लाखात घरी आला नवी कोरी कार, EMI देखील खिशाला परवडणारा
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 8:23 PM

कोणतीही गाडी घ्यायची म्हणलं की लोक आधी पैशांचा विचार करतात. ते देखील योग्य आहे. कोणतीही गोष्ट बजेटमध्ये घ्यायला हवी. पण, काही इतर पर्याय देखील आहे. तुम्ही लोनवर देखील कार घेऊ शकतात. आता जेव्हा गाडी खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मोठ्या संख्येने लोक एकरकमी पैसे देण्याऐवजी फायनान्स करण्याचा विचार करतात आणि त्या लोकांसाठी आज आम्ही नवीन डिझायरचे फायनान्स डिटेल्स सांगणार आहोत. जाणून घ्या.

मारुती सुझुकीची ऑल न्यू डिझायर सेडान सेडान सध्या खूप चर्चेत आहे. पूर्वीपेक्षा चांगला लूक आणि फीचर, तसेच नवीन इंजिन आणि बंपर मायलेज यामुळे कॉम्पॅक्ट सेडान खरेदी करणाऱ्यांसाठी नवी डिझायर खूप खास बनली आहे.

5 स्टार सेफ्टी रेटिंगसह कॉम्पॅक्ट सेडान

मारुती डिझायरची किंमत आणि खासियत आधी जाणून घ्या. याची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे. सीएनजी पर्यायांसह या सेडानचे एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस असे एकूण 9 व्हेरिएंट आहेत.

आज आम्ही तुम्हाला नवीन डिझायरच्या एलएक्सआय आणि व्हीएक्सआय मॅन्युअल पेट्रोलचे सोपे फायनान्स डिटेल्स सांगणार आहोत. हे चांगले फीचर्स आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह 24.79 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

मारुती डिझायर एलएक्सआय मॅन्युअल पेट्रोल फायनान्स ऑप्शन

मारुती सुझुकीच्या ऑल न्यू डिझायरच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 7.64 लाख रुपये आहे. तुम्ही मारुती डिझायर एलएक्सआय मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटला 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह फायनान्स करत असाल तर तुम्हाला 6.64 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. जर तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेत असाल आणि व्याजदर 10 टक्के असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 14 हजार 108 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. वरील अटींनुसार नवीन डिझायरच्या बेस मॉडेलला दिलेल्या कर्जावर 5 वर्षांत सुमारे 1.82 लाख रुपयांचे व्याज आकारले जाणार आहे.

मारुती डिझायर व्हीएक्सआय पेट्रोल मॅन्युअल फायनान्स ऑप्शन

मारुती सुझुकीच्या नवीन डिझायर व्हीएक्सआय ट्रिमची किंमत पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 7.79 लाख रुपये आणि ऑन-रोड 8.75 लाख रुपये आहे. जर तुम्ही मारुती डिझायर व्हीएक्सआयला 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह फायनान्स केले तर तुम्हाला 7.75 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. 10 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास दरमहा 16 हजार 466 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. नवीन डिझायर व्हीएक्सआय पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर वरच्या अटींनुसार फायनान्स केल्यास 5 वर्षांच्या कालावधीत सुमारे 2.13 लाख रुपयांचे व्याज मिळेल.

नवीन डिझायरला फायनान्स करण्यापूर्वी जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपवर जाऊन कार लोन आणि ईएमआय तसेच व्याजदराचा तपशील तपासावा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.