विमा पॉलिसीमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ

अधिकृतरीत्या वारासदाराची नोंद केलेली असल्यास ज्यावेळी विमाधारकाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्या विमाधारकाच्या वारसदाराला त्या पॉलिसीअंतर्गत मिळणारे सर्व लाभ मिळतात. (New rule of 'Beneficial Nominee' in insurance policy; These are the people who can get the benefits of the nominee)

विमा पॉलिसीमध्ये 'बेनेफिशियल नॉमिनी'चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ
SBI ग्राहकांसाठी खूशखबर : 2 लाखांचा विमा मोफत मिळणार
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 8:03 AM

नवी दिल्ली : आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांचे कसे होईल, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे अशी चिंतेतून मुक्त होण्यासाठी अनेकजण विमा पॉलिसी काढतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ असो वा इतर कुठल्या खाजगी विमा कंपन्या, लोक विमा पॉलिसी काढून कुटुंबियांच्या गरजांची चिंता दूर करतात. पण अशा विमा पॉलिसी काढताना त्या पॉलिसीच्या फॉर्ममध्ये आपल्याला नॉमिनीचे नाव नोंदवावे लागते. अधिकृतरीत्या वारासदाराची नोंद केलेली असल्यास ज्यावेळी विमाधारकाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्या विमाधारकाच्या वारसदाराला त्या पॉलिसीअंतर्गत मिळणारे सर्व लाभ मिळतात. (New rule of ‘Beneficial Nominee’ in insurance policy; These are the people who can get the benefits of the nominee)

जेव्हा तुम्ही कोणतीही मालमत्ता विकत घेता, कुठेही गुंतवणूक करता किंवा विमा पॉलिसी घेता, त्यावेळी तेथे तुम्हाला वारसदाराचे नाव जोडावे लागते. तसा प्रत्येक योजनेमध्ये नियम असतो. यावरूनच निश्चित झालेले असते कि विमाधारकाच्या पश्चात पॉलिसीचे फायदे नेमके कुणाला मिळायला हवेत. जर नॉमिनी अर्थात वारसदार अल्पवयीन असेल तर तो प्रौढ होण्याआधी जर विमाधारकाला मृत्यू झाल्यास मिळणारी भरपाई कोणाला दिली पाहिजे हेही आधीच ठरवता येते. त्यानुसार विमाधारक अल्पवयीन वारासदारासोबत आणखी एका व्यक्तीचे नाव नोंदवत असतो. जेणेकरून विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक फायदे ती व्यक्ती आपल्याजवळ ठेवते. तसेच अल्पवयीन वारसदार सुजाण झाल्यानंतर ती व्यक्ती ते सर्व लाभ त्या वारसदाराला देते.

नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

विमा योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक विमाधारकाने वारासदाराचे नाव नोंदवणे अनिवार्य आहे. आता विमा पॉलिसीमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलांची नावे ‘बेनेफिशियल नॉमिनी’ म्हणून नोंद करता येतात. नॉमिनी दोन प्रकारचे असतात, त्यातील एक म्हणजे केयरटेकर नॉमिनी आणि दुसरा म्हणजे बेनेफिशियल नॉमिनी. केयरटेकर नॉमिनी म्हणजे जो व्यक्ती विम्याच्या पैशाचा उपयोग करू शकत नाही, तर ती व्यक्ती विम्याच्या पैशांची केअरटेकर असते. दुसरा प्रकार म्हणजे बेनेफिशियल नॉमिनी, ज्यामध्ये वारसदार व्यक्ती पैशांचा वापरही करू शकते. या वारसदारांमध्ये आई-वडील, पती-पत्नी, मुलांची नावे नोंदवता येतात.

नव्या नियमानुसार, बेनेफिशियल नॉमिनी म्हणून नेमलेली व्यक्ती आपल्याच कुटुंबातील अर्थात सख्या नात्यातील असावी लागते. कारण विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभांची अंतिम हक्कदार ‘बेनेफिशियल नॉमिनी’च असते. सर्व अंतिम सुविधांचा हक्कदार तीच व्यक्ती असते. जर विमा पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चे नाव नोंदवण्यात आलेले नसेल, तर त्या विमा योजनेचे आर्थिक लाभ कुणालाच मिळू शकत नाहीत. तसेच नव्या नियमानुसार आता पॉलिसीमध्ये वारसदाराचे नाव कितीही वेळा बदलता येईल. मात्र अंतिमतः ज्या व्यक्तीचे नाव नोंदवलेले असेल त्याच ‘बेनेफिशियल नॉमिनी’ला विमाधारकाच्या मृत्यू पश्चात मिळणारे आर्थिक लाभ मिळतात. (New rule of ‘Beneficial Nominee’ in insurance policy; These are the people who can get the benefits of the nominee)

इतर बातम्या

Video | पेटलेला गॅस सिलिंडर घेऊन नदीकडे धाव, आग विझविण्यासाठी दाखवलेली हिम्मत एकदा पाहाच

Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.