Motor Insurance: गाड्या अनेक, इन्शूरन्स मात्र एक.. एकाच इन्शूरन्समध्ये होणार सर्व गाड्या कव्हर.. जाणून घ्या काय आहे नवा नियम ?

IRDAI द्वारे कार इन्शूरन्सच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तुम्ही गाडी कशी चालवता, नियमांचे किती पालन करता या बाबी लक्षात घेऊन आता तुमच्या कार इन्शूरन्सचा प्रीमिअम ठरवण्यात येईल.

Motor Insurance: गाड्या अनेक, इन्शूरन्स मात्र एक.. एकाच इन्शूरन्समध्ये होणार सर्व गाड्या कव्हर.. जाणून घ्या काय आहे नवा नियम ?
एकाच इन्शूरन्समध्ये होणार सर्व गाड्या कव्हरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 3:58 PM

देशभरातील कोट्यावधी वाहन चालकांसाठी एक चांगली बातमी आहे. आयआरडीएआयने (Insurance Regulatory and Development Authority of India) इन्शूरन्सच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गाडीच्या इन्शूरन्समध्ये सूट मिळू शकेल. आयआरडीएआयद्वारे कार इन्शूरन्समध्ये (Motor Insurance) करण्यात आलेले बदल लागू झाल्यावर, तुम्ही गाडी कशी चालवता, नियमांचे किती पालन करता या बाबींवर थोडक्यात तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य (Driving Skills) पाहून तुमच्या कार इन्शूरन्सचा प्रीमिअम (Vehicle Insurance Premium) ठरवण्यात येईल. तसेच तुमच्या घरात एकापेक्षा जास्त वाहने असतील तरी ती सर्व एकाच इन्शूरन्समध्ये कव्हर होतील. मोटरसायकल असो वा कार, प्रत्येक वाहनासाठी आता वेगळ्या इन्शूरन्सची गरज लागणार नाही.

तुमचे ड्रायव्हिंग कौशल्य ठरवणार कारचा इन्शूरन्स प्रीमिअम

IRDAIच्या नव्या नियमांनुसार, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्यानुसार (स्किल) तुमच्या कारचा इन्शूरन्स प्रीमिअम ठरेल. तुम्ही गाडी कशी चालवता, सर्व नियमांचे पालन करता का, रस्त्यावरील इतर वाहनांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षितपणे गाडी चालवता का ? या सर्व बाबींची नोंद ठेवण्यात येणार आहे. तुमचे ड्रायव्हिंग या सर्व निकषांत बसत असेल तर कारच्या इन्शूरन्सचा प्रीमिअम कमी भरावा लागेल. मात्र रॅश ड्रायव्हिंग करत असाल, वाहन नीट चालवत नसाल तर तुम्हाला जास्त प्रीमिअम भरावा लागेल. त्यामुळे सेफ ड्रायव्हिंग केल्यामुळे तुम्ही सुरक्षित रहालच. पण तुमच्या खिशावरही फार भार पडणार नाही.

कार इन्शूरन्सचे नवे नियम होणार तत्काळ लागू

आयआरडीएआयने लागू केलेल्या नियमांनुसार, ड्रायव्हिंग कौशल्यासह एका वर्षात तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवली याचा प्रभावही इन्शूरन्स पॉलिसीवर पडू शकेल. तुम्ही जितकी गाडी चालवाल, इन्शूरन्सचा प्रीमिअमही त्या प्रमाणात भरावा लागेल. कार इन्शूरन्सच्या नियमाती नवे बदल तत्काळ लागू होणार आहेत. इन्शूरन्स कंपन्यांनीही त्यासंबंधित योग्य पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

कसे असतील नवे नियम ?

IRDAI ने दिलेल्या माहितीनुसार, नव्या नियमाअंतर्गत कारमध्ये जीपीएस डिव्हाईस लावण्यात येतील. हे डिव्हाईस तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याबाबत माहिती गोळा करतील आणि तुमचा ड्रायव्हिंग स्कोअरचा रेकॉर्ड ठेवला जाईल. जेव्हा तुम्ही कारचा इन्शूरन्स काढायला जाल तेव्हा इन्शूरन्स कंपन्या तुमचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड चेक करतील व त्यानुसार तुमच्या कारचा इन्शूरन्स ठरवण्यात येईल.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.