Aadhaar Card : मोठ्या कामाचं ‘आधार’! भावा, मिनिटात कर आता व्यवहार

Aadhaar Card : आता पैसा पाठविण्यासाठी तुम्हाला आणखी एक सुविधा मिळाली आहे. त्यासाठी ना ओटीपीची झंझट आहे ना पिन लक्षात ठेवण्याचा ताप, कशी आहे ही प्रक्रिया

Aadhaar Card : मोठ्या कामाचं 'आधार'! भावा, मिनिटात कर आता व्यवहार
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 11:56 AM

नवी दिल्ली : आता आधार कार्ड (Aadhaar Card ) आणि त्याचा 12 अंकी क्रमांक ओळखीपुरता मर्यादीत राहिला नाही. तर आता आधार कार्ड तुम्हाला व्यवहारात पण मदत करणार आहे. आधार कार्ड पण एटीएम कार्ड सारखं काम करत आहे. तुम्हाला आधार कार्ड मदतीने बँकेतून पैसे काढण्यापासून ते दुसऱ्याला पाठविण्यापर्यंत सर्व कामे करता येतात. तुम्ही आधारच्या मदतीने तुमच्या खात्यात सध्या किती रक्कम शिल्लक आहे, ते तपासू शकता. BHIM युझर्स आधार कार्डच्या मदतीने पैशांचा व्यवहार करु शकतात. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आधार ट्रॅन्झॅक्शनचा (Digital transaction) उपयोग होईल. त्यासाठी काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमचे आधारकार्ड तुमचे ATM होईल.

Aadhaar च्या मदतीने रक्कम करा हस्तांतरीत आता आधारकार्डच्या मदतीने तुम्हाला रक्कम हस्तांतरीत करता येईल. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) त्यासाठी खास फिचर विकसीत केले आहे. त्यासाठी आधार इनबेल्ट पेमेंट सिस्टम (AePS) सुविधा मिळते. याच्या मदतीने तुम्ही आधार क्रमांक टाकून डिजिटल व्यवहार पूर्ण करु शकता. त्यासाठी तुम्हाला फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करावे लागते. हे पेमेंट फीचर अत्यंत सुरक्षित आहे. त्यासाठी तुमच्या बँकेचा तपशील द्यावा लागेल.

आधार बँक खात्याशी लिंक असावे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असेल तरच या योजनेचा फायदा घेता येईल. त्याशिवाय ही सुविधा मिळणार नाही. एखादा बँक खात्याशी आधार बेस्ड पेमेंट सिस्टम जोडणी झाली की, याचा लाभ घेता येईल. त्यासाठी तुम्हाला ना ओटीपीची गरज आहे ना पिन डालण्याचा ताप राहील. एक आधार कार्ड तुम्ही अनेक बँक खात्याशी जोडू शकता. AePS सिस्टमच्या मदतीने तुम्ही पैसे काढू शकता, जमा करु शकता. कोणालाही पैसा हस्तांतरण करु शकता. त्यासाठी बँकेत जाण्याची ही गरज नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे फायदे आधारकार्डच्या सोबतीने AePS सुविधा मदतीने सहज रक्कम हस्तांतरीत करता येते. रक्कम मिळवू शकतात. बँकेच्या खात्यात रक्कम जमा करता येते. मिनी स्टेटमेंट चेक करता येते. ई-केवायसी आधारभूत फिंगर डिटेक्शनचा लाभ घेता येतो.

असा घ्या लाभ या सेवेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जा. अथवा बँकेच्या प्रतिनिधीशी बोला. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ऑपरेटर्सकडून ही सुविधा मिळविता येते. त्याआधारे तुम्हाला व्यवहाराची सुविधा मिळते. त्यासाठी तुम्हाला बँकेचा प्रतिनिधी अथवा सीएससी सेंटरवर जावे लागले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.