Crude Oil : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी भारतावर कोणाचा दबाव? काय म्हणाले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री..

Crude Oil : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी भारतावर कोणाचा दबाव आहे? काय म्हणाले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री..पाहुयात..

Crude Oil : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी भारतावर कोणाचा दबाव? काय म्हणाले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री..
Petroleum MinisterImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 10:57 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे (Crude Oil Market) भाव पुन्हा एकदा भडकले आहेत . तर ओपेक संघटनेने (OPEC) कच्चा तेलाचे उत्पादन कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यातच रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी भारतावर दबाव वाढल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. त्यावर केंद्रीय पेट्रोलियम (Petroleum Minister) मंत्र्यांनी उत्तर दिले आहे..

रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाव असल्याच्या बातम्या येऊन धडकल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यावर खणखणीत उत्तर दिले आहे. भारताला कोणीही कच्चे तेल खरेदीपासून रोखलेले नाही.

एवढेच काय, तर ज्या देशाकडून भारताला इंधन खरेदी करायचे आहे, त्या देशाकडून भारत कोणालाही न जुमानता तेल खरेदी करणार असल्याची रोकठोक भूमिकाही पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केली. त्यामुळे भारतावर कोणाचा दबाव हे स्पष्ट झालं नसलं तरी भारत कोणाला जुमणणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा

युक्रेनवरील हल्ल्यानंतर पश्चिमी देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे रशियाच्या कच्चा तेलाचे दर कोसळले आहेत. अशा परिस्थितीत चीन आणि भारत कमी किंमतीत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. सध्या भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश ठरला आहे.

देशातील नागरिकांचे हित सर्वोपरी असल्याचा दावा करत केंद्र सरकारने रशियाकडून तेल खरेदी रोखण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नागरिकांना किफायतशीर दरांनी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.  त्यामुळे येत्या काही दिवसात भारत रशियाकडून तेल आयात सुरुच ठेवले हे स्पष्ट झाले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.