Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसायिकच नाही तर नोकरदारांनाही भरावा लागतो अ‍ॅडव्हान्स टॅक्स; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सचे नियम

सर्वसाधारणपणे अ‍ॅडव्हान्स टॅक्स फक्त व्यवसायिकांकडून भरला जातो, मात्र काही परिस्थितीमध्ये नोकरदार वर्गाला देखील अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज असते. नोकरदारांना कोणत्या परिस्थितीत अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्यवसायिकच नाही तर नोकरदारांनाही भरावा लागतो अ‍ॅडव्हान्स टॅक्स; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सचे नियम
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:30 AM

मुंबई : सर्वसाधारणपणे असे मानले जाते की अ‍ॅडव्हान्स टॅक्स (Advance tax) फक्त व्यावसायिकांकडून (Business Man) भरला जातो. पण अशा काही परिस्थिती असतात जेव्हा नोकरदार (Servant) लोक देखील अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या कक्षेत येतात? उदाहरणार्थ नाशिकमध्ये राहणारा रोहित हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. रोहितने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नोकरी बदलली. नवीन कंपनीने पगारातून कोणताही टीडीएस कापला नाही. सामान्य परिस्थितीत कंपन्या डीक्लेरेशननंतर 2.5 लाख रुपयांची सूट देतात. उर्वरित पगार संपूर्ण वर्षाचे उत्पन्न म्हणून गृहित धरले जाते आणि ते करपात्र बनवतात. कंपनी दर महिन्याला टीडीएसच्या नावाखाली पगारातून कपात करत असते. जेव्हा तुम्ही एकाच आर्थिक वर्षात नोकरी बदलता तेव्हा हे गणित अनेक वेळा बिघडते. कारण दोन फॉर्म 16 एकाच आर्थिक वर्षात तयार होतात. दोन्ही कंपन्या त्यांनी दिलेला पगार हे वर्षभराचे उत्पन्न मानतात. अशा परिस्थितीत पगारदारांनी आगाऊ कर भरावा. आगाऊ कर हा उत्पन्नासह आकारला जाणारा कर आहे. म्हणजेच तुम्ही जितक्या लवकर कमावता तितक्या लवकर तुम्ही कर वसूल करत रहा. लक्षात ठेवा की तुमची वार्षिक कर देयता 10,000 रु. पेक्षा जास्त असेल तरच आगाऊ कर जमा करणे आवश्यक आहे, असे चार्टर्ड अकाउंटंट अंकित गुप्ता म्हणतात.

पगाराव्यतिरिक्त उत्पन्न असल्यास अ‍ॅडव्हान्स टॅक्स

त्याचप्रमाणे पगारदार व्यक्तीला पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून उत्पन्न असल्यास उदाहरणार्थ, भाडे, लाभांश, व्याज इत्यादीतून कर देयक 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला आगाऊ कर भरावा लागतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आगाऊ कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. परंतु त्यांना मिळणारं उत्पन्न व्यावसायिक नसावं. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात दोन नोकऱ्या बदलल्या असतील तर अशा वेळी किती कर भरावा लागणार आहे ते विचारात घ्या, जर अ‍ॅडव्हान्स टॅक्स असेल तर तो वेळेवर भरा आणि दंड टाळा.

आगाऊ कराचे चार हप्ते

आर्थिक वर्षात एकूण 4 हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरला जातो. पहिला हप्ता 15 जून, दुसरा 15 सप्टेंबरपर्यंत, तिसरा 15 डिसेंबरपूर्वी आणि चौथा 15 मार्चपूर्वी भरावा लागतो. पहिल्या हप्त्यात एकूण कर रकमेच्या 15 टक्के, दुसऱ्या हप्त्यात एकूण कर दायित्वाच्या 45 टक्के रक्कम भरावी लागते. तर तिसऱ्या हप्त्यात एकूण कर देयकाच्या 75 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. आणि शेवटच्या हप्त्यात 100 टक्के कर भरणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता असेल तर तो वेळीच भरा आणि दंडापासून सुटका करून घ्या, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.