EPFO EDLI Insurance : पेन्शनच नाही, विम्याचा पण आधार!

EPFO EDLI Insurance : ईपीएफओ सदस्यांना केवळ पेन्शनचाच लाभ मिळतो असे नाही. तर सदस्याला 7 लाखांच्या विम्याचे संरक्षण असते. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या रक्कमेवर दावा करता येतो, त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा..

EPFO EDLI Insurance : पेन्शनच नाही, विम्याचा पण आधार!
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 2:11 PM

नवी दिल्ली : एप्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (Employees Deposit Linked Insurance) खास करुन ईपीएफओच्या सदस्यांसाठी राबविण्यात येते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विम्याचा लाभ मिळतो. ही विमा योजना ईपीएफ (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) यांच्या संयुक्तरुपाने मिळतो. जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावला, दुर्घटना घडली तर त्याच्या कुटुंबियांना विम्याच्या रक्कमेवर दावा करता येतो. विम्याची एकरक्कमी रोख वारसदाराला देण्यात येते. पण अनेक कर्मचाऱ्यांना या विम्याबद्दल माहिती नसते. या रक्कमेवर दावा करण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे.

ईडीएलआय योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसाला विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम 7 लाख रुपये असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना आणि विविध अधिनियम, 1952 अंतर्गत कर्मचाऱ्याला विम्याची सुविधा देण्यात येते. कर्मचाऱ्याच्या वेतनाआधारे विम्याची रक्कम मिळते. मृत्यूपूर्वी नोकरीच्या शेवटच्या वर्षात ईपीएफ, ईपीएस आणि ईडीएलआय अंतर्गत दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

ही कागदपत्रे आवश्यक

हे सुद्धा वाचा
  1. ईपीएफ कर्मचारीचे मृत्यू प्रमाणपत्र
  2. वारसदारांचा जन्म दाखला प्रमाणपत्र
  3. वारसदाराचे बँक खाते पासबूक, कॅन्सल चेक
  4. लाभार्थ्याचा आधार क्रमांक
  5. वारसदारांचे फोटो

हे लक्षात ठेवा विम्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर वारसदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे नाव, आधार संख्या, जन्मतारीख ईपीएफओच्या नोंदीशी जुळणे अत्यंत आवश्यक आहे.

कसा करावा दावा जर कर्मचाऱ्यांचा, सदस्याचा अचानक, अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना विम्याचे संरक्षण मिळते. ते विम्यासाठी दावा दाखल करु शकतात. त्यासाठी वारसदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. दावा दाखल करताना मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्कासंबंधीचे कागदपत्रे सादर करावे लागतील.

EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे

  1. सदस्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
  2. 12 महिने नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
  3. EPFO सदस्याला EDLI योजनेत नोकरीत असेपर्यंतच फायदा मिळतो.
  4. सेवेत नसताना वारसदारांना विमा योजनेत दावा दाखल करता येत नाही.
  5. विम्याची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात येते.

असा करा ऑनलाईन दावा

  1. सर्व आवश्यक कागदपत्रांचा स्कॅन कॉपी तयार ठेवा
  2. ऑनलाईन क्लेम फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी आहे
  3. पीडीएफ फाईलचा आकार 2 एमबी असावा. त्यापेक्षा अधिक नको
  4. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर जा
  5. विमा दावा दाखल करण्याच्या लिंकवर क्लिक करा
  6. वारसदाराला सर्व तपशीलवार माहिती जमा करावी लागेल
  7. युएएन क्रमांक, आधार, कर्मचाऱ्याचे नाव, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल
  8. तपशील भरल्यानंतर पिनवर क्लिक करा
  9. वारसदाराच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविण्यात येईल.
  10. मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न, जोडलेला असावा
  11. हा पिन जमा केल्यानंतर वारसदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करुन विमा रक्कम मिळविता येईल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.