Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post office Scheme : पोस्टाची ही योजना करणार करोडपती! किती करावी लागेल गुंतवणूक

Post office Scheme : शेअर बाजारात काही दिवसात, काही वर्षात करोडपती होणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण ज्यांना जोखीम घ्यायची नाही, त्यांना पण करोडपती होता येते. त्यांच्यासाठी पोस्टाची ही योजना मदतीला येऊ शकते. कोणती आहे ही योजना..

Post office Scheme : पोस्टाची ही योजना करणार करोडपती! किती करावी लागेल गुंतवणूक
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 7:23 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात रातोरात श्रीमंत होणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेक जण शेअर बाजारातून लखपती, करोडपती झाले आहेत. पण ज्यांना शेअर बाजाराचे गणित उमजत नाही, त्यांना करोडपती होता येणार नाही का? तर असे नाही. ज्यांना विना जोखीम श्रीमंत व्हायचे असेल त्यांच्यासाठी टपाल खात्याची योजना (Post Office Investment Scheme) कामी येईल. पोस्ट कार्यालयाच्या अनेक योजनेत गुंतवणुकीवर हमी तर मिळतेच पण जोरदार परतावा पण मिळतो. केंद्र सरकार अनेक बचत योजना चालविते. यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना आणि किसान विकास पत्र या योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. केंद्र सरकार (Central Government) या बचत योजनांची हमी घेते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा बुडत नाही.

दीर्घकालासाठी ही योजना फायदेशीर

पोस्टाच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडात (Public Provident Fund-PPF) दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जोरदार परतावा मिळतो. ही सरकारी योजना आहे. ती बाजारातील जोखीमेच्या अधीन नाही. यातील गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे खाते उघडता येते. या योजनेवर केंद्र सरकार व्याजदर निश्चित करते. तीन महिन्यांनी या व्याजदरांचा (Interest Rate) आढावा घेण्यात येतो. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून सुरक्षेची हमी मिळते.

हे सुद्धा वाचा

ही आहेत वैशिष्ट्ये

दीर्घकालीन गुंतवणूकदाराला या योजनेत अधिकचा फायदा मिळतो. या योजनेत सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. एका आर्थिक वर्षात गुंतवणुकीची मर्यादा आहे. या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतो. तर कमीत कमी 500 रुपये गुंतवू शकतो. योजनेत अधिक परतावा हवा असेल तर प्रत्येक महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

किती वाढविता येईल कालावधी

या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढवता येतो.ही गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. कर सूट मिळविता येते. खात्यात तीन वर्ष गुंतवणूक केल्यास कर्ज सुद्धा मिळते.

कसे व्हाल करोडपती

पोस्ट ऑफिसमधील पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास, 15 वर्षानंतर ही रक्कम 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर या रक्कमेवर व्याजाची रक्कम 18.18 लाख रुपयांचा परतावा मिळेल. या योजनेत कालावधी वाढवल्यास आणि गुंतवणूक कायम ठेवल्यास 25 वर्षानंतर गुंतवणूकदाराला 1.03 कोटी रुपये मिळतील.

कर सवलत मिळते

या योजनेतील गुंतवणुकीचे इतरही फायदे आहेत. या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर खात्याच्या कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सवलत मिळते. पीपीएफ खात्यात एकूण जमा रक्कमेवर तुम्हाला 3 वर्षानंतर कर्ज घेता येईल. एकूण रक्कमेच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येईल. गरज असेल तर अंशता रक्कम काढता येईल.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.