Bank Account Scam : फसवणुकीची नवीन ट्रिक, ओटीपी विनाच बँक खाते साफ, घ्या काळजी, नाहीतर एक रुपया पण शिल्लक राहणार नाही

Bank Account Scam : फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. ओटीपी विनाच बँक खाते साफ होत आहे, त्यामुळे सावज होण्याऐवजी सावध राहा.

Bank Account Scam : फसवणुकीची नवीन ट्रिक, ओटीपी विनाच बँक खाते साफ, घ्या काळजी, नाहीतर एक रुपया पण शिल्लक राहणार नाही
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 6:11 PM

नवी दिल्ली : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जग खेडं झालं आहे. घरबसल्या अनेक सुविधा मिळतात. नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. एका बाजूला तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुसह्य होत आहे तर दुसरीकडे याच जाळ्यात अडकून अनेकांना फटका बसत आहे. सायबर भामट्यांमुळे (Cyber Scammers) अनेकांची जमापूंजी साफ होत आहे. मेहनतीने बँकेत जमविलेला पैसा अडका, एका फटक्यात गायब होत असल्याने अनेकांना ऑनलाईन बँकिंग (Online Banking) नकोशी झाली आहे. सायबर भामटे सावज जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन कल्पना वापरतात. तुम्ही सावध नसाल तर हमखास सावज होता.

UPI खाते टार्गेट नवीन फसवणुकीत युपीआय खातेधारकांना टार्गेट करण्यात येत आहे. देशभरात अशा अनेक घटना समोर येत आहेत. तुम्ही वेळीच सावध झाला नाही तर तुमची शिकार झालीच समजा. त्यामुळे अज्ञात फोन कॉल्स, मॅसेज यांना उत्तर देण्याचे टाळा. त्यांच्या हेतू काय आहे ते लक्षात घ्या. बँकेचा अधिकारी असल्याचा, कॉल सेंटरवरुन बोलत असल्याचा दावा ते करतील. तेव्हा त्यांना खात्याशी संबंधित कोणतीही गोपनिय माहिती देऊ नका. कोणतीही लिंक उघडू नका. तुम्हीच चुका टाळल्या. आमिषांना बळी पडला नाहीत तर वाचू शकता.

आता तर ओटीपीची गरजच नाही आता तर फसवणुकीसाठी ओटीपीची गरज नाही. पूर्वी ओटीपी विचारुन खाते रिकामे करण्यात येत होते. पण आता तर ओटीपी न मागताच (Without OTP Scam), लिंक पाठवून, मॅसेजमधील लिंकद्वारे बँक खाते रिकामे करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अशी होत आहे फसवणूक शॉपिंग हिस्ट्री तपासून, शॉपिंग वेबसाईट हॅक करुन सायबर भामटे फसवणूक करत आहेत. तसेच तुम्ही सर्च इंजिनवर कोणते प्रोडक्ट शोधत आहात, हे तपासून सायबर भामटे कंपनीचे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवितात. प्रोडक्ट चांगले असून त्यावर मोठी सवलत जाहीर करण्यात येते. तुम्ही होकार दिल्यावर व्हॉट्सअप, मेलवर लिंक पाठविण्यात येते. त्यात तुमच्या युपीआयचा तपशील, बँक खात्याची माहिती, पत्ता इत्यादी तपशील घेण्यात येतो.

युपीआय पेमेंट पडेल महागात नंतर सायबर भामटे ग्राहकांना एक रुपये अथवा पाच रुपयांचे पेमेंट करुन ऑर्डर कन्फर्म करण्यास सांगतात. हे पेमेंट केल्यानंतर पुढे जे होते, त्याला त्वरीत न थांबविल्यास धडाधड बँक खाते रिकामे झाल्याचा एसएमएस येईल. त्यामुळे खात्याशी संबंधित कोणतीही गोपनिय माहिती देऊ नका. कोणतीही लिंक उघडू नका. तुम्हीच चुका टाळल्या. आमिषांना बळी पडला नाहीत तर वाचू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.