Bank Cash Deposit Rule Changed | आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

Bank Cash Deposit Rule Changed | बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.

Bank Cash Deposit Rule Changed | आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
कामाची बातमीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:39 PM

Bank Cash Deposit Rule Changed | बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल. रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.

किती रक्कमेसाठी नियम लागू?

नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर. कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्यांच्याकडे पॅन नाही ते कसे व्यवहार करणार?

ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.

हे सुद्धा वाचा

या गोष्टींची घ्या काळजी

  1. प्राप्तिकर कायद्यानुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी आहे. त्यामुळे जास्त रोखीचे व्यवहार टाळा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
  2. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे एका दिवसात तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडूनही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ शकत नाही.
  3. एका वेळी एका देणगीदाराकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारता येणार नाही, जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्याला मिळालेल्या रकमेएवढा दंड आकारला जाऊ शकतो.
  4. आरोग्य विम्यासाठी रोख रक्कम देऊ नका. जर करदात्याने विमा हप्ता रोखीने भरला तर तो कलम 80 डी वजावटीसाठी पात्र ठरणार नाही.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.