Credit Card : महत्वाची अपडेट करा नोट! आता क्रेडिट कार्डवर ही सुविधा विसरा राव
Credit Card : आता क्रेडिट कार्डवर ही सुविधा घेता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना त्यासाठी खर्चाची तयारी करावी लागणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याविषयीची भूमिका जाहीर केली.
नवी दिल्ली : क्रेडिट कार्ड हे अनेक ठिकाणी उपयोगी पडते. पण क्रेडिट कार्ड केवळ शॉपिंग करण्यासाठी वापरले जाते असा समज आहे. क्रेडिट कार्ड (Credit Card) याव्यतिरिक्त पण उपयोगात येते. अनेक जण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विविध बिल, आगाऊ रक्कम जमा करतात. त्यामुळे त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर वाढतो. त्यांना बँकेकडून खर्चाची मर्यादा वाढून मिळते. तसेच वैयक्तिक कर्जाची मर्यादा पण वाढविण्यात येते. अडचणीच्या वेळी ही रक्कम उपयोगी पडते. आता क्रेडिट कार्डवर ही सुविधा घेता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना त्यासाठी खर्चाची तयारी करावी लागणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) याविषयीची भूमिका जाहीर केली.
विम्यावरील ही सुविधा विसरा विमा योजनेवर ज्यांनी कर्ज (Insurance Policy Loan) घेतले आहे. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने त्यांच्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आता विमाधारकांना, विमा पॉलिसीवरील कर्जाचे हफ्ते फेडता येणार नाहीत. हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. याविषयीची माहिती विमा कंपन्यांना देण्यात आली आहे.
क्रेडिट कार्ड पेमेंटचा पर्याय वगळणार IRDAI ने याविषयीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, विमा पॉलिसीवरील कर्जाचा हप्ता यापुढे क्रेडिट कार्डवरुन भरता येणार नाही. विमा कंपन्यांना पेमेंट सिस्टममधून Credit card पेमेंटचा पर्याय हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमा कंपन्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्याचा पर्याय बंद करावा लागणार आहे. तसेच ग्राहकांना याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.
90 टक्क्यांपर्यंत मिळेल कर्ज विमा कंपन्या एकूण विमा पॉलिसीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार ही टक्केवारी कमी जास्त होते. युलिप, शॉर्ट टर्म आणि इतर विमा पॉलिसीवर धोरणांनुसार कर्ज रक्कम मिळते. समर्पण मूल्यावर कर्ज रक्कम अवलंबून असते. केवळ मुदत विम्यावर कर्ज मिळत नाही, असा कंपन्यांचा नियम आहे. त्यामुळे अशा पॉलिसीधारकांनी नाहक कंपन्यांच्या गळ्यात पडणे टाळावे. इतरांना त्यांच्या विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार कर्ज रक्कम मिळते.
मग व्याज किती द्यावे लागेल? बँकिग अथवा वित्तीय संस्थांपेक्षा सलवतीत कर्ज मिळते. साधारणतः 9 ते 10 टक्के दरानं कर्ज मिळते. खासगी बँका, पतसंस्थांचे कर्जावरील व्याजदर 12-18 टक्क्यांपर्यंत असतो. प्रक्रिया शुल्क, छुपे शुल्क यामुळे तुम्हाला हे कर्ज फार महागात पडते. त्यामानाने विम्यावर घेतलेले कर्ज स्वस्त असते.
तर नाही लागणार दंड क्रेडिट कार्ड बिल पेमेंटबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नियम लागू केला होता. त्यानुसार, बिल पेमेंट करण्यासाठी निर्धारीत वेळेनंतर काही दिवसांचा कालावधी देण्यात आला. आरबीआयच्या या नियमामुळे ग्राहकांना कमालीचा फायदा झाला. त्यांना 3 दिवसांपर्यंत कोणतेही विलंब शुल्क न भरता क्रेडिट कार्डचे बिल अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे ड्यू डेट विसरली तरी पुढील तीन दिवसांत क्रेडिट कार्डधारकाला बिल अदा करता येते.