Railway : आता रेल्वेत छोट्या मुलांना घेऊन प्रवास करणेही होणार सोयीस्कर; रेल्वेने घेतला मोठा निर्णय !

भारतीय रेल्वेने प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी, मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेत प्रवास करणाऱया महिलांना आता लहान मुलांना घेऊन प्रवास करणे सोयीचो होणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने बेडरोल ची सुविधा सुरू केली आहे.

Railway : आता रेल्वेत छोट्या मुलांना घेऊन प्रवास करणेही होणार सोयीस्कर; रेल्वेने घेतला मोठा निर्णय !
मध्य रेल्वे मुंबई भरतीImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 7:42 PM

मुंबई : कोविड कालावधीत, सुमारे 2 महिन्यांपूर्वी ट्रेनमध्ये बंद केलेली बेडरोल सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर एसी कोचमध्ये बेडरोल उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू झाली. मात्र तरीही ही सुविधा सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध (Available in all trains) करून देण्यात आलेली नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ट्रेन बुक केल्यानंतर, ज्या ट्रेनमध्ये प्रवास (Travel by train) करायचा आहे त्या ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा आहे की नाही हे कळत नाही. पण IRCTC ने आता, ही समस्या सोडवली आहे. ज्याद्वारे तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहात हे कळू शकते. त्यात बेडरोलची सोय (Bedroll facility)आहे की नाही? याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱया महिलांना आता, आपल्याच सीटला लागून, मुलांसाठी एका छोट्या बेडच्या आकाराची सीट जोडून देण्यात येईल. यामुळे महिलांना लहान मुलांना घेऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.

अनेक गाड्यांमध्ये नाही सुविधा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एसी डब्यांमधून पडदेही काढण्यात आले आणि प्रवाशांना देण्यात येणाऱया ब्लॅकेंटची सुविधाही बंद करण्यात आली. मात्र, कोविडची तिसरी लाट संपताच रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये पडदे लावण्यास सुरुवात केली आहे आणि बेडरोलची सुविधाही सुरू केली आहे, मात्र तरीही ही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही.

तिकीट बुक केल्यानंतर, मिळेल माहिती

तिकीट बुक केल्यानंतर, IRCTC तुमच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवते. ज्याद्वारे तुम्ही प्रवास करणार असलेल्या ट्रेनमध्ये बेडरोल आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. रेल्वेने आतापर्यंत ९५० हून अधिक गाड्यांमध्ये बेडरोल सुविधा पुनर्संचयित केली आहे.

IRCTC च्या या लिंकवरून अपडेट

भारतीय रेल्वेच्या वेबसाईडवर क्लिक करून, तुम्ही प्रवास करण्यापूर्वी जाणून घेऊ शकता की तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करणार आहात त्या ट्रेनमध्ये किती वेळ बेडरोल सुविधा उपलब्ध आहे. वेबसाईडवर वर क्लिक केल्यानंतर open चा पर्याय येईल. तुम्ही ते उघडा आणि संपूर्ण तपशील तुमच्या स्क्रीनवर फक्त एका क्लिकवर येईल.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.