RTO News : आरटीओ कार्यालयाच्या चकरा थांबणार..घर बसल्या पूर्ण करा ही कामे..

RTO News : सर्वसामान्यांच्या आरटीओ कार्यालयातील चकरा आता थांबणार आहे. अनेक सेवा आता तुम्हाला घरचीच पूर्ण करता येणार आहे.

RTO News : आरटीओ कार्यालयाच्या चकरा थांबणार..घर बसल्या पूर्ण करा ही कामे..
या सेवा मिळतील घर बसल्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 6:23 PM

नवी दिल्ली : आता तुम्हाला वाहन परवान्यासंबंधीच्या (DL) अनेक कामांसाठी परिवहन कार्यालयाच्या (RTO) चकरा माराव्या लागणार नाहीत. राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 58 सेवा आता पूर्णतः ऑनलाईन केल्या आहेत.

या 58 सेवांमध्ये वाहन परवान्याशीसंबंधीत अनेक सेवांचा समावेश आहे. मंत्रालयाने याविषयीची अधिसूचनाही जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कार्यालयाला नाहक खेटे घालण्याची गरज उरली नाही.

यामध्ये वाहन परवाना, कंडक्टर लायसन्स, परमिट (Permit) आणि मालकी हस्तांतरण (Transfer of Ownership) या सारख्या सेवांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

आधार सत्यापन (Aadhaar authentication) सेवेमार्फत नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता आरटीओ कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता नाही.

मंत्रालयाने शनिवारी या सेवांबाबत माहिती दिली. त्यानुसार, कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस या सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल. तर आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होईल.

ऑनलाईन सेवांमध्ये शिकाऊ परवान्यासाठी अर्ज, शिकाऊ परवान्यात पत्ता, नाव, फोटो बदलणे, डुप्लीकेट लर्नर लायसन्ससाठी अर्ज करणे आदी सेवांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे, कंडक्टर लायसन्समध्ये पत्ता बदलणे यासारख्या कामांसाठीही आता आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही.

आधार कार्ड नसणाऱ्या व्यक्तीला स्वतः अर्ज सादर करुन या सेवांचा फायदा उचलता येईल. त्यासाठी इतर कागदपत्रे या व्यक्तीला सादर करावी लागतील.

या सेवा पूर्वी ऑनलाईन देण्यात आल्या होत्या. पण कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा उपयोग कुचकामी ठरत होता. त्यानंतर सरकारने या सेवांमध्ये कायमचा बदल केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.