Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?

Ration : आता राशन बाबत सरकारने नवा नियम काढला आहे..पण हा नियम करण्याची गरज का पडली..

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?
दोनदा दाबा आंगठाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 5:12 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही ही राशन कार्डधारक (Ration card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी स्वस्त धान्य योजनेसंदर्भात (Rationing Scheme) सरकारने मोठा बदल केला आहे. आता लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा आंगठा द्यावा लागणार आहे. आता हा बदल कोणत्या राज्य सरकारने (state Government) केला आणि का केला ते पाहुयात..

रेशनबाबतीत हा बदल केला आहे, मध्य प्रदेश सरकारने. राज्य सरकारने याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आता राशनिंगसाठी दोनवेळा आंगठा दाबावा लागणार आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

जर लाभार्थ्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली नाही. अथवा या प्रक्रियेत अडथळा आणला तर त्यांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य हवे असेल तर त्यांना राज्य सरकारचा नियम पाळावा लागेल.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्रत्येकी 5-5किलो धान्य वितरीत करण्यात येते. त्यामुळे त्यांना आता केंद्रासाठी एकदा आणि राज्य सरकारसाठी दुसऱ्यांदा धान्य घेतले म्हणून दोनदा आंगठा दाबावा लागेल.

सध्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकदा आंगठा दिल्यावर लाभार्थ्यांना राशन देण्यात येते. परंतू, या ऑक्टोबर महिन्यात ही व्यवस्था बदलण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारसाठी एक-एक असे दोनदा आंगठा दाबावा लागेल.

या प्रक्रियेमुळ राशन मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. जेवढे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करतील. तेवढा या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. कारण त्याशिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर धान्य वितरीत केले जाणार नाही.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत देशभरात केंद्र सरकार जवळपास 80 कोटी जनतेला प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो गहू आणि तांदळाचे वितरण करते. त्यासाठी प्रति किलो दोन ते तीन रुपये आकारण्यात येतात.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.