Credit Card : सतत क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याची गरजच नाही, या नामी युक्तीने झटक्यात होईल पेमेंट..

Credit Card : पेमेंटसाठी आता क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही..

Credit Card : सतत क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याची गरजच नाही, या नामी युक्तीने झटक्यात होईल पेमेंट..
असे करा पेमेंटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 8:11 PM

नवी दिल्ली : जर तुम्हीही खरेदीसाठी, बिल अदा करण्यासाठी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच. पेमेंटसाठी (Payment) आता सतत क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड न नेता ही सहज पेमेंट करु शकता. काय आहे ही नामी युक्ती ते पाहुयात..

रुपे क्रेडिट कार्ड हे BHIM App ला लिंक करता येते, ही गोष्ट तुम्हाला माहिती असेलच. तर आता ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) नवीन आयडिया लढवली आहे. त्यासाठी एक खास फिचर्स महामंडळाने आणले आहे.

तर हे रुपे क्रेडिट कार्ड ग्राहकांना युपीआय अॅपसोबत लिंक करता येणार आहे. त्यामाध्यमातून ग्राहकांना क्रेडिट कार्ड सोबत न बाळगताच बिल अदा करता येईल. खरेदी करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे वापरकर्त्यांना, क्रेडिट कार्ड सोबत घेऊन दुकानावरील स्वाईप मशीनवर स्वाईप करण्याची बिलकूल आवश्यकता नाही. भीम अॅपला रुपे क्रेडि कार्ड जोडून ही सुविधा मिळविता येईल.

या पद्धतीत भीम अॅपच्या माध्यमातून दुकानदाराकडील क्यूआर कोड स्कॅन करता येईल. युपीआय खात्याशी जोडलेल्या अॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट अदा करता येणार आहे.

जर तुम्ही क्रेडिट कार्डला थेट दुकानावर न नेल्याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड चोरी जाण्याची शक्यता कमी होते. तसेच कार्डचा तपशील चोरीला जाण्याची भीतीही नसते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने काही बँकांनाच ही सुविधा प्रदान केली आहे. त्यांना भीम अॅपच्या मदतीने युपीआयचे फीचर वापरता येईल. त्यामाध्यमातून रुपे क्रेडिट कार्डचा वापर करुन पेमेंट करता येणार आहे.

NPCI याविषयी 20 सप्टेंबर 2022 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ही सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना भीम अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे लागेल. त्यामध्ये त्यांना बँकेचे संबंधित क्रेडिट कार्ड जोडण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यासाठी बँक निवडावी लागेल.

युपीआय अॅपवर रुपी क्रेडिट कार्डचा पर्याय तुम्हाला दिसेल. तो निवडावा लागेल. वैध तपशील जमा केल्यानंतर ग्राहकांना एसएमएसद्वारे ओटीपी मिळेल.तो टाकल्यानंतर वापरकर्त्याला युपीआय पिन सेटअप करता येईल. त्यानंतर ही सुविधा मिळेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.