WhatsApp Loan : काय सांगता, व्हॉट्सअपवर कर्ज मिळणार 10 लाखांचं! या कंपनीने दिले सरप्राईज

WhatsApp Loan : आता जीवन अधिक सूकर होणार आहे. अडचणीच्या वेळी कोणत्याही जादा कागदपत्राविना तुम्हाला सहज व्हॉट्सअपवरुन कर्ज मिळेल. त्यासाठी आता बँकेच्या येरझरा माराव्या लागणार नाही. काय आहे ही जोरदार योजना...

WhatsApp Loan : काय सांगता, व्हॉट्सअपवर कर्ज मिळणार 10 लाखांचं! या कंपनीने दिले सरप्राईज
सहज कर्ज मिळवा
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली : आता जीवन अधिक सूकर होणार आहे. अडचणीच्या वेळी कोणत्याही जादा कागदपत्राविना तुम्हाला सहज व्हॉट्सअपवरुन कर्ज (WhatsApp Loan) मिळेल. त्यासाठी आता बँकेच्या येरझरा माराव्या लागणार नाही. कर्ज देताना बँका तुमच्याकडून अनेक अर्जफाटे भरून घेतात. बँकेतील (Bank Loan) एखादा ठेवीदार ओळखीचा असेल तर त्याचा वशिला मागतात. इतरही कागदपत्रांचे ओझे ग्राहकांच्या माथी मारतात. पण आता या सर्व प्रक्रियेला फाटा बसला आहे. तुम्हाला मोबाईलमधील व्हॉट्सअपवर जाऊन 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. हे व्यावसायिक कर्ज असेल. त्यासाठी तुम्हाला जास्त झंझाटीचा सामना करावा लागणार नाही.

IIFL फायनान्सचा उपक्रम IIFL फायनान्स कंपनी व्हाट्सअपवर ग्राहकांना त्वरीत कर्ज देणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. व्यावसायिक कारणासाठी, लघुउद्योगासाठी हे कर्ज देण्याची तयारी या वित्तीय कंपनीने केली आहे. अशा प्रकारे व्यावसायिक कर्ज, एमएसएमई कर्ज उद्योगांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्ज करण्यापासून, ते मंजूर करणे आणि पैसा हस्तांतरीत करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. भारतातील 450 दशलक्षहून अधिक युझर्संना आयआयएफएल फायनान्स, 24×7 एंड-टू-एंड डिजिटल लोनची सुविधा देते.

आईआईएफएल फायनान्स काय आहे आईआईएफएल फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी रिटेल एनबीएफसीपैकी एक आहे. IIFL कडे 10 दशलक्षहून अधिकचे ग्राहक आहेत. यामध्ये बँकेशीसंबंधित कमी ग्राहक आहेत. ही कर्जाची सुविधा छोट्या आणि लघु उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. हे कर्ज डिजिटल पद्धतीने उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

एआई-बॉट विचारेल प्रश्न व्हाट्सअप कर्जासाठी एक कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होईल. त्याला एआई-बॉट असे म्हणतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर, तो योग्य वाटल्यास, तुम्ही पात्र ठरल्यास, लागलीच कर्ज मंजूर होईल. हे कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअपक्रमांकावर “हाय” टाईप करुन पाठवावे लागेल. ही संपूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया आहे. आयआयएफएल फायनान्स सध्या व्हॉट्सअप कर्ज चॅनलद्वारे 1 लाख एमएसएमई क्रेडिट माहिती सेवा देऊ शकते.

छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुविधा आयआयएफल फायनान्स खास करुन छोटे व्यापारी, व्यावसायिकांसाठी ही सुविधा देत आहे. हाच वर्ग त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. बिझनेस हेड भारत अग्रवाल यांनी ही प्रक्रिया पेपरलेस असून कर्ज वितरण ही अत्यंत सुलभ असल्याचा दावा केला आहे. भारतातील 450 दशलक्षहून अधिक युझर्संना आयआयएफएल फायनान्स, 24×7 एंड-टू-एंड डिजिटल लोनची सुविधा देते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.