Ola-Uber : ‘उबेर’चा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-‘ओला’च्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

| Updated on: Apr 11, 2022 | 10:02 PM

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना महागाईने आणखी एक फटका दिला आहे. ही बातमी ओला आणि उबेरने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे.

Ola-Uber : उबेरचा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-ओलाच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी
ओला, उबर प्रवाशांसाठी, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) वाढत असताना महागाईने आणखी एक फटका दिला आहे. ही बातमी ओला आणि उबेरने (Uber) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता उबेरने प्रवास करणाऱ्यांना बारा टक्के अधिक प्रवासाचे (travel) पैसे द्यावे लागणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना महागाईने आणखी एक फटका दिला आहे. ही बातमी ओला आणि उबेरने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता उबेरने प्रवास करणाऱ्यांना बारा टक्के अधिक प्रवासाचे पैसे द्यावे लागणार आहे. दक्षिम आशिया आणि भारतातील उबेर कंपनीचे प्रमुख नितीश भूषण यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, ‘आम्हाला आमच्या चालकांना भावना समजतो. तेलाच्या किंमती अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ते चिंतेत आहेत.आमच्या चालकांना मदत करण्यासाठी आम्ही दिल्ली-एनसीएआर याठिकाणी ट्रिपची किंमत 100 टक्क्याने वाढवत आहोत. आम्ही पुढील काळात तेलाच्या किंमतींवर लक्ष ठेवून आणि गरज पडल्यास आणखी निर्णय घेऊ.’

उबेरचे कर्मचारी संपावर

कंपनीने माहिती देताना आपल्या चालकांच्या अडचणी जाणून घेतल्याय. दक्षिम आशिया आणि भारतातील उबेर कंपनीचे प्रमुख नितीश भूषण पुढे म्हणालेत आहेत की, ‘ओला आणि उबेर दोन्ही कंपन्यांचे चालक संपावर गेले आहेत. त्यांच्या मागणीबाबत कंपनीने कोणताही निर्णय न घेतल्याने हा संप सुरु झाला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या चालकांना मदत करण्यासाठी आम्ही दिल्ली-एनसीएआर याठिकाणी ट्रिपची किंमत 100 टक्क्याने वाढवत आहोत.आम्हाला आमच्या चालकांना भावना समजतो. तेलाच्या किंमती अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ते चिंतेत आहेत.आमच्या चालकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.’

‘ओला’वरही दबाव वाढणार

उबेरने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे कंपनीने चालकांच्या अडचणी समजून घेत प्रवासाचे दर वाढवले आहे. मात्र, यामुळे थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. कारण उबेरने प्रवासाचे दर हे बारा टक्क्यांनी वाढवले आहे. आता हे सगळं असलं तरी संपावर गेलेल्या वाहन चालकांना थोडा दिसाला मिळाला आहे. तीच मागणी वाहन चालकांकडून केली जात होती. आता उबेरने प्रवासाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम ओलावरही होऊ शकतो. चालकांची मागणी मान्य करण्याचा कंपनीवर दबावही वाढणार आहे.

इतर बातम्या

Special Report | शिवसेना गृहखात्यावर आणि कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांवर नाराज? – Tv9

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Special Report | Udayanraje यांच्याबद्दल Gunratna Sadavarte नेमकं काय बोलले होते? -Tv9