Aadhaar Card SMS : जोरदार, एका एसएमएसने तुमचे आधार होणार लॉक, गैरवापर टळणार!

Aadhaar Card SMS : आधार क्रमांक जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक सुविधा सुरु केली आहे. आता एका एसएमएसवर आधार कार्ड लॉक-अनलॉक करता येणार आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होईल.

Aadhaar Card SMS : जोरदार, एका एसएमएसने तुमचे आधार होणार लॉक, गैरवापर टळणार!
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 7:30 PM

नवी दिल्ली :  आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर आता प्रत्येक ठिकाणी होतो. प्रत्येक नागरिकाकडे हे महत्वपूर्ण ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याआधारे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात. बँक खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेताना, सिमकार्ड खरेदीसाठी, पासपोर्ट तयार करण्यासाठी, गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्यासाठी, जवळपास अनेक कामात आधार कार्डची गरज पडते. अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक (Number) मागण्यात येतो. हे ओळखपत्र प्रत्येक भारतीयांसाठी आवश्यक झाले आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक सुविधा सुरु केली आहे. आता एका एसएमएसवर आधार कार्ड लॉक-अनलॉक करता येणार आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होईल.

अनेक नागरिकांना हे माहिती नाही की, आधार कार्ड सोबत वागविण्याची, बाळगण्याची आवश्यकता नाही. त्यांना मोबाईलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करुन ठेवता येते. अथवा ई-मेलला ड्राफ्टमध्ये आधार कार्ड सेव्ह करता येते. आता युपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही. आता आधार कार्डच्या मदतीने ही तुम्ही युपीआयचा पिन सेट (UPI PIN Set) करु शकता.

युपीआय आयडी सेट (UPI ID Set) करण्यासाठी तुमच्याकडे एक बँक खाते, या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. ग्राहकांकडे डेबिट कार्ड नसेल तर ते युपीआय आयडी आधार कार्डसोबत लिंक करु शकतात. आधार ओटीपी एक सुरक्षित मार्ग मोकळा करुन देते. आधार ओटीपीच्या माध्यमातून वापरकर्त्याला त्याचा युपीआय पिन पण बदलता येतो. आधारच्या मदतीने ग्राहकाला नवीन युपीआय पिनही सेट करता येतो.

हे सुद्धा वाचा

आता आधारकार्ड वापरकर्त्यांना त्यांचा आधारचा गैरवापर टाळण्यासाठी आणखी एक सुविधा देण्यात आली आहे. युझर्स आधार क्रमांकाला एका एसएमएसद्वारे लॉक अथवा अनलॉक करु शकतात. लॉक झाल्यानंतर आधार कार्डचा तपशीलाचा कोणीही गैरवापर करु शकत नाही. या आधारे तुम्ही डेटा सुरक्षित ठेऊ शकता. आधार क्रमांक लॉक करण्यासाठी तुमच्याकडे 16 अंकी व्हर्च्युअल आयडी (VID Number) असणे आवश्यक आहे.

SMS च्या मदतीने असे करा आधार कार्ड लॉक

  1. आधार कार्ड लॉक करण्यासाठी ही सोपी पद्धत उपयोगी येईल
  2. तुमच्या मोबाईलमधील एसएमएस उघडा
  3. सर्वात अगोदर GETOTP<space> 4 वा 8 अंकी आधार क्रमांक टाका
  4. आता हा टाईप केलेला एसएमएस 1947 या क्रमांकावर पाठवा
  5. तुम्हाला लागलीच 6 अंकांचा OTP मिळेल
  6. आधार कार्ड लॉक करण्यासाठी लॉकिंग रिक्वेस्ट येईल
  7. LOCKUID<space> 4 वा 8 अंकी आधार क्रमांक टाका
  8. त्यानंतर तुम्हाला आलेला <space>OTP टाकून 1947 क्रमांकावर पाठवा
  9. लागलीच तुम्हाला या मॅसेजच्या पुष्टीचा एसएमएस येईल
  10. आता कार्ड जर अनलॉक करायचे असेल तर त्यासाठी पण प्रक्रिया आहे
  11. UNLOCKED<Space>VID असे टाईप करा
  12. VID चे 6 वा 8 अंक <Space>OTP 1947 या क्रमांकावर पाठवा
  13. तुमचा आधार कार्ड क्रमांक अनलॉक होईल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.