Online fraud : तुमच्या एका चुकीमुळे होऊ शकते बँक खाते रिकामे; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असते. एक चुकही मोठी महागात पडू शकते. क्षणात तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Online fraud : तुमच्या एका चुकीमुळे होऊ शकते बँक खाते रिकामे; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:43 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नोटबंदीची घोषणा केली. नोटबंदीच्या घोषणेनंतर आर्थिक व्यवहारात क्रांती आल्याचे पहायला मिळाले. ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online payment) मोठ्याप्रमाणात वाढ झाली. ऑनलाईन पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहार अधिक सोपा झाला. तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून युपीआयच्या (UPI)मदतीने तुम्हाला पाहिजे तेवढ्या पैशांचा व्यवहार अवघ्या काही मिनिटांमध्ये करू शकता. तुम्ही घरी बसल्याबसल्या एखाद्याला पैसे पाठवू शकता किंवा त्याच्याकडून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच ऑनलाईन पेमेंटमुळे दुसरा सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे कर चोरीला आळा बसला. रोखीच्या व्यवहारांमधून मोठ्याप्रमाणात कर चोरी होण्याची शक्यता असते. हे झाले युपीआय प्रणालीचे काही फायदे.

मात्र नाण्याला दोन बाजू असतात. युपीआय यंत्रणेचे काही फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. तुम्हाला तुमची एक चूक मोठी महागात पडू शकते. क्षणात तुमचे खाते रिकामे हेऊ शकते. सध्या सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे गुन्हेगार फोन, मॅसेज तसेच इतर माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधून तुमच्याकडून तुमच्या मोबाईल बँकिंग संदर्भातील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांच्या बोलण्याला तुम्हील बळी पडलात तर तुमचे खाते रिकामे झालेच म्हणून समजा. अशा स्थितीमध्ये आपल्या खात्याची सुरक्षा कशाप्रकारे करावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

हे सुद्धा वाचा

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अशी काळजी घ्या

  1. UPI पीन शेअर करू नका – लक्षात ठेवा तुमचा युपीआय पीन हा सर्वात महत्त्वाचा असतो. याच युपीआय पीनच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचे व्यवहार करता येतात. बँक किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयाकडून तुम्हाला तुमच्या पीन संदर्भात विचारणा केली जात नाही. त्यामुळे तुम्हाला जर कोणी फोन किंवा इतर माध्यमातून युपीआय पीन शेअर करायला सांगत असेल तर वेळीच सावध व्हा. कोणालाही पीन शेअर करू नका.
  2. कोणलाही मोबाईल, लॅपटॉपचा अ‍ॅक्सेस देऊ नका – अनेकदा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी फोन पे, गुगल पे आणि इतर अ‍ॅप डाऊनलोड करत असतात. या अ‍ॅपबाबतची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये असते. जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा किंवा लॅपटॉपचाअ‍ॅक्सेस एखाद्याला दिला तर तुमच्या मोबाईलचा दुरपयोग होण्याची शक्यता असते. संबंधित व्यक्ती त्यामधून तुमचे बँक डिटेल्स मिळू शकतो.
  3. फसव्या वेबसाईटपासून सावधान – अनेकदा तुम्हाला एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईलवर एखादी लिंक पाठवली जाते. आणि केवायसी अपडेटच्या नावाखाली त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. तुम्ही अशा लिंकवर क्लिक केल्यास क्षणात तुमचे खाते खाली होऊ शकते. तसेच नेटवर सर्चिंग करताना तुम्हाला अशा अनेक साईट दिसतात. ज्या तुम्हाला वेगवेगळ्या रिवार्डचे अमिष दाखवतात. मात्र तुम्ही त्या साईटवर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला मिळू शकते. त्यामुळे अशा वेबसाईटपासून सावधान राहावे.
  4. UPI पीन सतत चेंज करत रहा – आपन जर अनेक दिवस एकच युपीआय पीन ठेवला तर तो इतरांना माहित होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सतत आपला युपीआय पीन चेंज करत रहावे. तसेच युपीआयमधून एका दिवसात किती रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार व्हायला हवा याबाबत एक लिमिट देखील निश्चित करा.
Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....